Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आणि सौदी अरबचे राजे यांच्या दरम्यान दूरध्वनी संवाद


नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरबचे राजे सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

उभय नेत्यांनी कोविड-19 संक्रमणामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानासंदर्भात चर्चा केली.  पंतप्रधानांनी सौदी अरबची सध्या सुरु असलेल्या जी-20 गटाच्या अध्यक्षतेबद्दल प्रशंसा केली. जी -20 च्या पातळीवर संक्रमणाशी लढण्यासाठी पुढाकारामुळे समन्वित प्रतिसाद वाढविण्यात मदत झाल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.  त्यांनी जी -20 च्या अजेंडावर असलेल्या मुख्य विषयांवरही चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि सौदी अरबच्या द्वीपक्षीय संबंधावर समाधान व्यक्त केले, आणि सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्याविषयी कटिबद्धता व्यक्त केली. पंतप्रधानांनी कोविड संक्रमण काळात भारतीय प्रवाशांना सौदी प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल महामहिम राजे सलमान यांचे विशेष आभार मानले. 

पंतप्रधानांनी महामहिम राजे सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद यांच्या, सौदी अरबच्या राजपरिवारातील इतर सदस्य आणि सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्याची कामना केली. 

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com