पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महामहीम महमूद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
रमजानच्या आगामी पवित्र महिन्यानिमित्त पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती आणि जनतेला शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी सध्या कोविड -19 या साथीच्या आजारांमुळे उद्भवलेल्या आव्हानांवर चर्चा केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपापल्या देशांमध्ये केलेल्या उपाययोजनांबाबत एकमेकांना माहिती दिली.
पॅलेस्टाईन अधिकाऱ्यांनी त्यांच्या जनतेचे या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि या प्रयत्नांसाठी भारताकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या आव्हानात्मक काळात सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी योग्य त्या पातळ्यांवर संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
****
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
Discussed the COVID-19 situation with Palestinian President H.E. Mahmoud Abbas. India will provide all possible support to the friendly Palestinian people in their fight against the pandemic. https://t.co/y9ZqCoGOW1
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020