पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया गणराज्याचे राष्ट्रपती मून जे -इन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी केलेल्या कोरिया दौऱ्याची आठवण करून दिली आणि दोन्ही देशांमधील वाढत्या संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी कोविड -19 या जागतिक महामारी आणि जागतिक आरोग्य प्रणाली आणि आर्थिक परिस्थितीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा केली. महामारीचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी परस्परांना माहिती दिली.
या संकटावर मात करण्यासाठी कोरियाने दिलेल्या तंत्रज्ञान- आधारित प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारतीय अधिकाऱ्यांनी महामारीचा सामना करण्यासाठी एकजुटीच्या उद्देशाने ज्याप्रकारे भारतीयांना प्रोत्साहित केले, त्याची राष्ट्रपती मून जे -इन यांनी प्रशंसा केली.
भारतातील कोरियन नागरिकांना भारतीय अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या मदतीबद्दल कोरियन राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी भारतीय कंपन्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा आणि वाहतूक सुलभ केल्याबद्दल कोरियन सरकारचे कौतुक केले.
दोन्ही देशांचे तज्ञ कोविड -19 च्या उपायांवर संशोधन करताना एकमेकांशी सल्लामसलत करतील आणि अनुभवांची देवाणघेवाण करतील याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शविली.
कोरियात होणाऱ्या आगामी राष्ट्रीय विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी राष्ट्रपती मून यांना शुभेच्छा दिल्या.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
Had a telephone conversation with President @moonriver365 on the prevailing COVID-19 situation and how we can fight this pandemic through cooperation and leveraging the power of technology. https://t.co/e51GAApSaP
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2020