Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आणि कोमोरोसच्या राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधान आणि कोमोरोसच्या राष्ट्रपतींची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीत जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने कोमोरोसचे राष्ट्रपती अझाली असौमानी यांची भेट घेतली.

आफ्रिकन संघाला जी 20 चा कायमस्वरूपी सदस्य बनवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि प्रयत्नांबद्दल राष्ट्रपती असौमानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारताची भूमिका आणि आफ्रिकेशी असलेले संबंध लक्षात घेता भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात हे घडले याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. यामुळे भारत-कोमोरोस संबंधांनाही चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले. भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.

जी 20 मध्ये सामील झाल्याबद्दल आफ्रिकन संघ आणि कोमोरोसचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि ग्लोबल साऊथचा आवाज पोहचवण्यासाठी भारताकडून केले जात असलेले प्रयत्न अधोरेखित केले आणि जानेवारी 2023 मध्ये भारताने आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल शिखर परिषदेची आठवण करून दिली.

दोन्ही नेत्यांना त्यांच्या द्विपक्षीय भागीदारीबाबत चर्चा करण्याचीही संधी मिळाली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले आणि सागरी सुरक्षा, क्षमता निर्मिती आणि विकास भागीदारी यासारख्या क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर चर्चा केली.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai