Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आणि इजिप्तचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इजिप्तचे राष्ट्रपती महामहीम अब्देल फताह अलसिसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या जागतिक परिस्थितीबाबत उभय नेत्यांनी चर्चा केली आणि आपापल्या देशातील जनतेच्या संरक्षणासाठी संबंधित सरकारांनी उचललेल्या पावलांबद्दल एकमेकांना माहिती दिली. एकमेकांकडून शिकण्यासाठी अनुभव आणि उत्तम पद्धती यांची निरंतर देवाणघेवाण करण्याच्या उपयुक्ततेबाबत त्यांनी सहमती दर्शविली.

या कठीण काळात औषधांच्या पुरवठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन पंतप्रधानांनी इजिप्तच्या राष्ट्रपतींना दिले. इजिप्तमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल त्यांनी राष्ट्रपती अलसीसी यांचे आभार मानले.

दोन्ही देशांच्या टीम दृढ समन्वय आणि अनुभवांचे आदानप्रदान सुनिश्चित करण्यासाठी परस्परांच्या संपर्कात राहतील.याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

B.Gokhale/S.Kane/P.Kor