Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आणि इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये दूरध्वनी संभाषण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.

दोन्ही नेत्यांनी त्यांच्या क्षेत्रात आणि जगात पसरलेल्या कोविड-19 साथीबद्दल चर्चा केली.

इंडोनेशियाला औषध उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रशंसा केली. वैद्यकीय उत्पादने किंवा दोन्ही देशांमधील व्यापारातील इतर वस्तूंच्या पुरवठ्यात येणारी अडचण दूर करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी केले.

दोन्ही देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या परस्पर नागरिकांच्या प्रश्नांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि यासंदर्भात शक्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी दोन्ही देशांची पथके एकमेकांच्या संपर्कात राहतील, यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

इंडोनेशिया हा भारताचा महत्त्वाचा सागरी भागीदार आहे. तसेच द्विपक्षीय संबंधातील ताकद दोन्ही देशांना साथीच्या परिणामांविरोधात लढण्यासाठी बळ देईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष विडोडो आणि इंडोनेशियाच्या नागरिकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane