पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ७ जुलैपर्यंत इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यानंतर लगेचच ६ ते ८ जानेवारी २०१७ दरम्यान पंतप्रधान जर्मनीच्या दौऱ्यावर जातील. जर्मनीत होणाऱ्या बाराव्या जी २० शिखर परिषदेत ते सहभागी होतील.
फेसबुकवर केलेल्या अनेक पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यांची माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणताता, “पंतप्रधान बेन्जामिन न्येतानाहू यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मी ४ ते ६ जुलै दरम्यान इस्त्रायलला जात आहे. त्यानंतर ६ ते ८ जुलै दरम्यान मी जर्मनीत हमबर्ग इथे होणाऱ्या बाराव्या जी २० शिखर परिषदेतही सहभागी होईन. इस्त्रायलला जाणारा पहिलाच भारतीय पंतप्रधान म्हणून या भेटीतून दोन्ही देश आणि जनता परस्परांच्या जवळ येतील या दृष्टीने मी या भेटीकडे बघतो आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षी भारत आणि इस्त्रायल यांच्यातल्या राजनैतिक संबंधाना २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
विविध क्षेत्रातली दोन्ही देशातली भागीदारी अधिक दृढ करण्याविषयी मी पंतप्रधान न्येतानाहू यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. वेगवेळ्या क्षेत्रात ही भागीदारी परस्परांना लाभदायक कशी ठरेल, यावर चर्चेचा भर असेल. त्याशिवाय दहशतवादाच्या समान आव्हानाविषयी बोलण्याची संधीही आम्हाला मिळेल.
मी राष्ट्रपती रुवेन रुवी रिवलीन यांचीही भेट घेणार आहे. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात त्यांचा आणि इस्त्रायलच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्याची संधी मला लाभली होती.
या दौऱ्यात विवध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इस्त्रायली नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळणार आहे. त्याशिवाय इस्त्रायलमध्ये असलेल्या भारतीय समुदायाशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. हे नागरिक भारत आणि इस्त्रायल दरम्यानचा दुवा आहेत.
आर्थिक विषयात, मी भारत आणि इस्त्रायलमधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबत आणि नवउद्योजकांसोबत चर्चेत भाग घेईन. उद्योगवृद्धी आणि गुंतवणूकीला दोन्ही देशांचे प्राधान्य असून, याविषयी या बैठकीत विशेष चर्चा होईल. त्याशिवाय, इस्त्रायलच्या तंत्रज्ञान आणि संशोधनाविषयीही मला माहिती मिळू शकेल.
माझ्या या दौऱ्यादरम्यान, मी होलोकास्ट दुर्घटनेच्या बळींच्या स्मरणार्थ बांधलेल्या ‘वाद वासेम’ स्मृतीस्थळालाही भेट देईन. ही घटना मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिकांपैकी एक मानली जाते. त्यानंतर, हाफियाच्या मुक्तीसाठी १९१८ साली झालेल्या युद्धात वीरमरण पत्करणाऱ्या भारतीय जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करेन.
६ जुलैच्या संध्याकाळी बाराव्या जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीच्या हमबर्ग इथे रवाना होईन. पुढच्या दोन दिवसात जी-२० शिखर परिषदेतल्या सहभागी देशांच्या नेत्यांशी मी विविध विषयांवर चर्चा करेन. वैश्विक वित्तीय स्थैर्य, शाश्वत विकास, शांतता यांना बाधक ठरणाऱ्या विविध जागतिक संकटांवर या चर्चेचा मुख्य भर असेल.
गेल्यावर्षीच्या हैग्झोऊ परिषदेतल्या निर्णयांचा यावेळी आढावा घेतला जाईल. तसेच, दहशतवाद, हवामान बदल, शाश्वत विकास, वृद्धी आणि व्यापार, डीजीटायझेशन, आरोग्य, रोजगार, स्थलांतर, महिला सक्षमीकरण आणि आफ्रिकेसोबतच्या भागीदारीवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. यावर्षीच्या शिखर परिषदेची संकल्पना “परस्परांशी जोडलेल्या जगाला आकार देणे” ही आहे.
या परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी द्वीपक्षीय मुद्यांवर चर्चा करण्याची संधीही मला मिळणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.
बी. गोखले/राधिका/दर्शना
Tomorrow, I begin a historic visit to Israel, a very special partner of India's. https://t.co/nLByftnnw6
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2017
I look forward to holding extensive talks with my friend, @IsraeliPM @netanyahu, who shares a commitment for vibrant India-Israel ties.
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2017
From boosting economic ties to furthering people-to-people interactions, my Israel visit has a wide range of programmes.
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2017
On 7th & 8th July I will join the G20 Summit in Hamburg, Germany. Here are more details. https://t.co/ODAqszS2mc
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2017