Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी 5 डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे केले लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरु इथे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या 5 युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे लोकार्पण केले.

डीआरडीओच्या या पाच प्रयोगशाळा बंगळुरु, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या पाच शहरांमध्ये आहेत. या प्रत्येक प्रयोगशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वॉन्टम तंत्रज्ञान, कॉग्निटिव्ह तंत्रज्ञान, असिमेट्रिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट मेटेरियल्स यासारख्या भविष्यातील संरक्षण प्रणालीच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञानावर काम करतील.

24 ऑगस्ट 2014 रोजी डीआरडीओच्या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधानांनी अशा प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत सूतोवाच केले होते. युवकांना निर्णय घेण्याचे अधिकार आणि आव्हानात्मक संशोधन संधी उपलब्ध करुन त्यांना सक्षम करावे, असे मोदी यांनी डीआरडीओला त्यावेळी सांगितले होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, या प्रयोगशाळा देशातील उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या रुपरेषेला आकार देण्यात मदत करतील.

भारतात विविध क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनाची दिशा आणि वेग निश्चित करण्यासाठी वैज्ञानिकांनी नव्या दशकासाठी एक निश्चित रुपरेषा तयार करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

वैज्ञानिकांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले कि, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा जगातील सर्वोत्तम कार्यक्रमांपैकी एक आहे. त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रम आणि हवाई सुरक्षा प्रणालीची प्रशंसा केली.

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात भारताला मागे राहता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. सरकार वैज्ञानिक समुदायाबरोबर एक पाऊल पुढे चालायला तयार आहे, जेणेकरुन राष्ट्रीय सुरक्षेसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संशोधनात वेळेची गुंतवणूक करता येईल.

मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमाला बळकटी देण्यात डीआरडीओचे संशोधन महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाच डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या स्थापनेमुळे भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासासाठी पाया तयार झाला आहे. संरक्षण तंत्रज्ञानात भविष्यात सज्ज राहण्यासाठी भारताला स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने डीआरडीओची ही मोठी झेप आहे.

वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन बंगळुरु येथे केले जाईल. आयआयटी मुंबईत क्वॉन्टम तंत्रज्ञानाचे काम केले जाईल. आयआयटी चेन्नई कॉग्निटिव्ह तंत्रज्ञानाचे काम पाहिल. तर, कोलकाता इथल्या जदावपूर विद्यापीठात असिमेट्रिक तंत्रज्ञानाबाबत संशोधन केले जाईल. स्मार्ट मेटिरियल्स या महत्वपूर्ण क्षेत्रातील संशोधन हैदराबाद इथे केले जाईल.

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane