नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल आज शोक व्यक्त केला. भारतीय स्क्वॉश च्या क्षेत्रातील एक असामान्य खेळाडू असलेल्या मनचंदा यांच्या खेळातील प्राविण्य तसेच समर्पण भावनेचा त्यांनी आदराने उल्लेख केला. मनचंदा यांनी सैन्यदलात देशाप्रति बजावलेल्या कर्तव्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांच्या एक्स या समाजमाध्यमावरील हॅन्डलवर त्यांनी पोस्ट केले, “भारतीय स्क्वॉश च्या क्षेत्रातील एक असामान्य खेळाडू राज मनचंदा जी यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करत आहे. त्यांचे खेळातील प्राविण्य व समर्पण भावना सर्वांच्याच परिचयाची आहे. त्याबद्दल त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांहूनही अधिक त्यांची खेळाप्रती असलेली उत्कट निष्ठा व सर्व वयोगटातील खेळाडूंना या खेळाकडे प्रेरित करण्याची शक्ती त्यांना विलक्षण बनवते. स्क्वॉश या खेळाबरोबरच त्यांनी सैन्यदलात बजावलेल्या कर्तव्यातून त्यांची देशसेवा दिसून येते. त्यांच्या कुटुंबियांच्या व चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांति: PM@narendramodi”
Saddened by the passing away of Shri Raj Manchanda Ji, a true legend of Indian squash known for his dedication and excellence. In addition to the laurels he won, it was his passion for the sport and his ability to inspire generations that truly set him apart. Beyond the squash…
— PMO India (@PMOIndia) December 4, 2024
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai