पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरीनामचे उपराष्ट्रपती मायकेल ए. अधीन यांची भेट घेतली. सूरीनामचे उपराष्ट्रपती विश्व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत.
पंतप्रधानांनी सूरीनाममध्ये प्रवासी भारतीय केवळ देशाच्या विकासातच नव्हे तर दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंध मजबूत करण्यात बजावत असलेल्या सक्रीय भूमिकेचे कौतुक केले. भारत सूरीनामला क्षमता निर्मिती आणि मनुष्यबळ विकास यासाठी सर्वतोपरी सहाय्य देणे सुरुच ठेवण्यासाठी कटिबध्द असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
Mr. Ashwin Adhin, Vice President of Suriname met PM @narendramodi. pic.twitter.com/lmggamn3Cp
— PMO India (@PMOIndia) March 11, 2016