Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सिक्किम सेंद्रिय महोत्सव 2016चे केले उद्‌घाटन, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणावरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले

पंतप्रधानांनी सिक्किम सेंद्रिय महोत्सव 2016चे केले उद्‌घाटन, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणावरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले

पंतप्रधानांनी सिक्किम सेंद्रिय महोत्सव 2016चे केले उद्‌घाटन, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणावरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले

पंतप्रधानांनी सिक्किम सेंद्रिय महोत्सव 2016चे केले उद्‌घाटन, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणावरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगटोक येथे सिक्किम सेंद्रिय महोत्सव 2016चे उद्‌घाटन केले आणि शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणावरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले.

कृषी राज्यमंत्री, कृषी उत्पादन आयुक्त आणि कृषी सचिवांच्या विविध गटांच्या पाच अहवालांचे सादरीकरण पंतप्रधानांसमोर करण्यात आले.

पंतप्रधानांनी “सिक्किम ऑरगॉनिक”च्या बोधचिन्हाचे डिजिटल अनावरण केले. त्यांनी सिक्किममध्ये विकसित करण्यात आलेल्या तीन नव्या ऑर्किड जातींचे उद्‌घाटन केले.

पूर्णपणे सेंद्रिय शेतीच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी सिक्किमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांची प्रशंसा केली. मृदा आरोग्य कार्डाच्या 100 टक्के व्याप्तीचे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल त्यांनी सिक्किमच्या दोन जिल्ह्यांना प्रशस्तीपत्रे दिली.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सिक्किमचे माजी राज्यपाल रामा राव यांना आदरांजली वाहिली.

शेतकरी आणि जमतींच्या कल्याणाप्रती सिक्किमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या दूरदृष्टीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. राज्याच्या विकासाचे श्रेय त्यांनी चामलिंग यांना दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कल्याण आणि विकासाचे जे मुद्दे उठवले आहेत, त्यामध्ये केंद्र सरकार लक्ष घालेल.

पंतप्रधान म्हणाले की, ते सिक्किममध्ये तिथल्या शेतकऱ्यांचे पाहुणे म्हणून आले आहेत. ते म्हणाले की, परिषदेत जी चर्चा झाली, त्यात देशाच्या कृषी क्षेत्रासाठी समग्र दृष्टिकोनाची रुपरेखा निश्चित करण्यात आली. ते म्हणाले की, सर्व राज्ये या विषयावर करण्यात आलेल्या सादरीकरणातून संबंधित माहिती घेऊ शकतील. याचे “सिक्किम घोषणापत्र” असे वर्णन करायला हवे.

पंतप्रधान म्हणाले की, अनेक अडचणींचा सामना आणि संघर्ष करुन सेंद्रिय शेतीकडे वळणे याचे सिक्किम हे एक उदाहरण आहे. आज संपूर्ण जगाने सिक्किमच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, या सेंद्रिय शेतीचे वारे आता देशभरात वाहू लागतील.

पंतप्रधानांनी यावेळी अलिकडेच पॅरिसमध्ये झालेल्या सीओपी 21 बैठकीचा उल्लेख केला, ज्यामध्ये मूलभूत तत्त्वांकडे परत जाण्याची कल्पना मोठ्या आवेशात मांडण्यात आली. ते म्हणाले की, सिक्किमने निसर्गाशी समतोल राखत जगण्याचा आदर्श ठेवला आहे आणि म्हणूनच ते विकासाचे मॉडेल आहे, जे निसर्गाचे रक्षण करते.

भारत सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गंगटोकला दहाव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी सिक्किमचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, राज्यांनी एखादा जिल्हा किंवा वॉर्ड निवडून 100 टक्के सेंद्रिय परिसर म्हणून त्याचा कायापालट करावा. यामुळे राज्यांच्या अन्य भागांनाही सेंद्रिय शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.

अलिकडेच जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि विम्याची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.

पंतप्रधान म्हणाले की, मृदा आरोग्य कार्डासारख्या योजना स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. ते म्हणाले की, देशभरात मृदा प्रयोगशाळांचे जाळे पसरायला हवे आणि इतकेच नाही, तर उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळांमधल्या प्रयोगशाळांचा यासाठी वापर करता येईल.

पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विशेष गरजा पूर्ण करणाऱ्या किसान मोबाईल फोन सारख्या विशिष्ट उत्पादनांची गरज आहे. ते म्हणाले की, एखादा स्टार्ट-अप या दिशेने पुढाकार घेईल.

बाटलीबंद पेयामध्ये थोडासा फळांचा रस मिसळण्यात यावा, या आपल्या सूचनेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, सिक्किममध्ये विमानतळाच्या उभारणीमुळे सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल. ते म्हणाले की, ग्रामीण भागात रस्ते बांधण्याच्या मागेही कृषी उत्पादने आणि बाजारपेठा यांना जोडण्याचा विचार आहे. ते म्हणाले की, झाडे लावणे आणि पशुपालन हे देखील कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग बनायला हवेत.

प्रत्येक राज्यात प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी डिजिटल ऑनलाईन व्यासपीठ-विकसित करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

S. Kane/ S. Tupe/ M. Desai