Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामाईक केली अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाची झलक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाची झलक समाज माध्यमावर सामायिक केली आहे. मोदी म्हणाले की या प्रदर्शनाबद्दल मला एक विशेष जिव्हाळा आहे, कारण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी या प्रदर्शनाची प्रगती जवळून पाहिली आहे. अशी प्रदर्शने निसर्गाच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करतात आणि निसर्गाच्या शाश्वततेबद्दल जागरूकता निर्माण करतात, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधानांनी ‘X’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये सांगितले: 

“अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाची एक झलक येथे सामायिक करत आहे. या प्रदर्शनाबद्दल मला विशेष जिव्हाळा आहे, कारण मुख्यमंत्री पदावर असताना मी या प्रदर्शनाची प्रगती पाहिली आहे. अशी प्रदर्शने निसर्गाच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करतात आणि शाश्वततेबद्दलही जागरूकता निर्माण करतात. तसेच स्थानिक शेतकरी, माळी आणि निसर्गप्रेमींना त्यांच्या सृजनशीलतेचे प्रदर्शन करण्यासाठीही एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात.”

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com