Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी साधला अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद

s20170625110143

पंतप्रधानांनी साधला अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन येथे राऊंड टेबल मिटिंगमध्ये अमेरिकेच्या २० उच्च  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भेटून  संवाद साधला.

 

सीईओज चे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले किआज  जगाचे  भारताच्या  अर्थव्यवस्थेवर लक्ष असून   तरुण लोकसंख्या आणि वाढता मध्यम वर्ग  हे दोन घटक  तसेच विशेषतः  निर्मितीव्यापारवाणिज्य आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध जागतिक रुची भारताच्या अर्थव्यवस्थेवर  केंद्रित करण्यास कारणीभूत आहेत.

 

ते म्हणाले कीगेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने लोकांच्सर राहणीमानाचा दर्जा वाढविण्यावर जोर दिला आहे. सध्या जागतिक भागीदारीची आवश्यकता असून भारताचे केंद्र सरकार कमाल प्रशासन आणि किमान सरकार हे तत्व अंगिकारण्यासाठी  कार्यरत आहे.

 

त्यांनी केंद्र सरकारने एकट्याने सुधार आणलेल्या ७००० सुधारणाबद्दल सांगितले . यावरून जागतिक पातळीवर राहण्यासाठी भारताचे प्रयत्न निर्देशित करतात.  त्यांनी कार्यक्षमतापारदर्शीपणा वृद्धी आणि सर्वांसाठी  फायदे यावर  सरकार जोर देत असल्याचे सांगितले 

 

जीएसटीवर बोलतांना पंतप्रधान म्हणाले की गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे.

 

ते पुढे म्हणाले कीजीएसट ची अंमलबजावणी हे महत कठीण कार्य असून  कदाचित हे पुढील  केसेस हाताळण्याला उपयोगी  ठरेल. यावरून असे दिसते कि भारत अनेक कठीण निर्णय सहज घेऊन त्याची अंमलबजावणी करू  शकतो.  

 

सीईओजनी पंतप्रधानाच्या धोरणकार्याच्या अंमलबजावणीसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिकतेबद्दल   तसेच अलिकडेच इज ऑफ  डुईंग बिसिनेस वरील कामाबद्दल प्रशंसा केली. डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्किल इंडिया ,  विमुद्रीकरण  आणि  पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणल्यामुळे वाढलेल्या  विश्वासासाठी   सीईओज ने  प्रशंसा केली .  

 

काही सीईओजने कौशल्य विकास आणि शिक्षणासाठी भागीदारीची इच्छा बोलून दाखवली. त्यानी त्याच्या संस्थानकडून सामाजिक कार्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सांगितले जसे कीमहिला प्रोत्साहनडिजिटल तंत्रज्ञानशिक्षण आणि  खाद्य प्रक्रिया, पायभूत सेवा संरक्षणनिर्मिती आणि ऊर्जासुरक्षा यावर सुद्धा चर्चा झाली.   शेवटीपंतप्रधानांनी सीईआज च्या निरीक्षणाबद्दल  त्यांचे आभार मानलेत.

 

उद्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी भेटीबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले कीअमेरिका आणि भारताने मूल्यांचे आदान   प्रदान केले आहे.  ते म्हणाले कीजर आफ्रिका बळकट झाला   तर त्याचा साहजिकच भारताला फायदा होईल.  त्यांनी सुदृढ अमेरिका जगासाठी चांगली असल्याचा विश्वास व्यक्त केला.  

 

त्यांनी  सीईओज ने भारताच्या महिला प्रोत्साहनपुनर्नवीकरणीय ऊर्जास्टार्ट अप आणि नवीन शोध या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखवली. त्यांनी शाळेत जाण्याऱ्या मुलींसाठी सॅनिटरी प्रॅक्टिस उत्पादने आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे सुचवले. यामुळे भारताचा जीवन दर्जा सुधारेल असे पुन्हा सांगितले.

 

 

B.Gokhale