नवी दिल्ली, 11 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या पॅम्पलमाऊसेस येथील सर शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यानामध्ये सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी, मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम नवीनचंद्र रामगुलाम देखील उपस्थित होते.
या वेळी, पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या प्रगतीसाठी तसेच भारत-मॉरिशस संबंधांना भक्कम आधार देण्याच्या दिशेने या दोन महान नेत्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले.
पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाच्या अंतर्गत या ऐतिहासिक बागेत एक रोप लावले.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai