पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली अर्पण केली. सरदार पटेल यांनी भारताच्या एकात्मतेची सांगड घातली असे नवी दिल्ली येथील राजपथावर जमलेल्या उत्साही युवक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी सांगितले. सरदार पटेल यांच्या निर्णय क्षमतेतील बुध्दीमत्ता आणि ताकद यामुळे सर्व दृष्ट मनसुबे उधळले गेले आणि आधुनिक तसेच स्वतंत्र भारत उदयाला आला असे पंतप्रधानांनी सांगितले.
सरदार पटेल यांनी आपल्याला “एक भारत” दिला आणि आता त्याला “श्रेष्ठ भारत” बनवण्याचे दायित्व आपल्यावर आहे असे पंतप्रधान म्हणाले. एकता, शांतता आणि सलोखा याच तत्त्वांवर 125 कोटी भारतीय प्रगती करु शकतील असेही त्यांनी सांगितले.
1920 च्या सुमाराला अहमदाबादचे महापौर म्हणून सरदार पटेल यांनी घेतलेल्या पुढाकारांचे स्मरण पंतप्रधानांनी केले. या पुढाकारांमध्ये स्वच्छता आणि महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या आणि राज्यांशी चर्चा करुन हाती घेण्यात येणाऱ्या “एक भारत, श्रेष्ठ भारत” या नव्या योजनेची रुपरेषा पंतप्रधानांनी स्पष्ट केली. या योजनेअंतर्गत दोन राज्ये एकमेकांशी एक वर्षासाठी आगळी-वेगळी भागीदारी करतील. या एका वर्षात सांस्कृतिक आणि विद्यार्थी देवाणघेवाण, हाती घेतली जाईल, ज्यामुळे या दोन राज्यातील जनतेला एकमेकांना जाणून घेण्याची आणि अधिक निकट येण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी वेगवेगळया राज्यांनी एकमेकांचे भागीदार बनावे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन केले.
पंतप्रधानांनी यावेळी जपलेल्या जनसमुदायाला शपथ दिली आणि एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला.
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि वेंकय्या नायडू यावेळी उपस्थित होते.
J.Patnakar/S.Tupe/N.Sapre
I bow to Sardar Patel. May his blessings always be with the nation & inspire us to scale newer heights: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 31, 2015
Paying homage to Sardar Patel. pic.twitter.com/lRlswkIcuB
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2015