Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जैन आचार्य लिखित पुस्तकाचे केले प्रकाशन

पंतप्रधानांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जैन आचार्य लिखित पुस्तकाचे केले प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जैन आचार्य रत्नसुंदरसुरीस्वरजी महाराज लिखित ‘मारू भारत सारू भारत’ (माझा भारत चांगला भारत) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. रत्नत्रयी ट्रस्टच्या साहित्य सत्कार समितीतर्फे मुंबईत आयोजित या प्रकाशन समारंभाला संबोधित करताना पंतप्रधानांनी आचार्य रत्नसुंदरसुरीस्वरजी यांच्या कार्याचे कौतुक केले.

३०० पुस्तके ही फार मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराज साहेबांच्या कार्यात जीवनाच्या अनेक पैलुंचे प्रतिबिंब दिसून येते. ही पुस्तके त्यांची दिव्य वाणी सांगतात आणि त्यातून समाजाला बरेच काही परत देण्याची उर्मी प्रतिबिंबित होते, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्र धर्म हा धर्माच्या वर आहे, असे त्यांनी सांगितले. संतांच्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारताने प्रदान केलेल्या संत आणि मुनींनी देशाच्या उभारणीकडे समाजाला नेले असून हा आपला वारसा आहे. दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छ भारत आणि एक सशक्त भारत घडविण्याच्या कामी देशाच्या युवा शक्तीला जुंपणे यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

भारताने कधीही जातीयवादाची भाषा केली नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी नेहमीच अध्यात्मिकतेची शिकवण दिली आहे. अध्यात्मिकतेच्या माध्यमातून प्रत्येक समस्या सोडवता येते, यावर आमचा विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केल्याबद्दल जैन आचार्य रत्नसुंदरसुरीस्वरजी महाराज यांनी त्यांचें आभार मानले. कुटुंबांना मूल्ये असतात आणि देशाला संस्कृती असते, असेही ते म्हणाले.

M. Pange/ S. Tupe/ M. Desai