Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये 33 पदके जिंकणाऱ्या भारतीय पथकाचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 18 मार्च 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. ट्युरिन,इटली येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 33 पदकांची घवघवीत कमाई करून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

आज संसदेत पंतप्रधानांनी या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्या अथक परिश्रम व उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले –

“ट्युरिन, इटली येथे झालेल्या विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा  2025 मध्ये आपल्या खेळाडूंनी देशाला अभिमान वाटावा असे यश संपादन केले आहे! भारतीय संघाने एकूण 33 पदके जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे.

आज संसदेत या पथकाची भेट घेतली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले!”

@SpecialOlympics”

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com