Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी वाराणसी येथील अधिकारिता शिबिरात उपकरणांचे वितरण केले, महामना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधानांनी वाराणसी येथील अधिकारिता शिबिरात उपकरणांचे वितरण केले, महामना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधानांनी वाराणसी येथील अधिकारिता शिबिरात उपकरणांचे वितरण केले, महामना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे सामाजिक अधिकारिता शिबिरात उपस्थित राहून मदत सहाय्य आणि उपकरणांचे वितरण केले.

या वितरण सामुग्रीमध्ये शिवणयंत्रे, ब्रेल किट्‌स, श्रवणयंत्रे, स्मार्ट केन्स आणि अन्य स्मार्ट उपकरणांचा समावेश होता. लाभार्थींमध्ये विभिन्न विकलांग व्यक्ती आणि विधवांचा समावेश होता.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी केलेल्या भाषणाची आठवण करुन दिली, ज्यात ते म्हणाले होते की त्यांचे सरकार गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी समर्पित असेल. ते म्हणाले की केंद्र सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत.

आपले सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अशा प्रकारची सुमारे 1800 शिबिरे देशभरात झाली आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यापूर्वीच्या सरकारांच्या कालावधीत झालेल्या शिबिरांच्या तुलनेत हा आकडा खूपच मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरांमुळे उपकरणांच्या वाटप प्रक्रियेतील दलालांना आळा बसल्याचे ते म्हणाले.

प्रशासनात शिस्त आणल्‍यामुळे आणि दलालांना अटकाव झाल्यामुळे चारही बाजूने हल्ले होत आहेत असे ते म्हणाले. या हल्ल्यांमुळे गरीब आणि दुर्बल घटकांची सेवा करण्याच्या मार्गापासून आपण विचलित होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनंदिन वापरात अपंग व्यक्तींसाठी “दिव्यांग” हा शब्द वापरण्याबाबत त्यांनी विस्ताराने भूमिका मांडली ते म्हणाले की त्यांच्या व्यंगावर भर न देता त्यांच्यातल्या वैशिष्टयपूर्ण क्षमतेवर भर द्यायला हवा.

दिव्यांग व्यक्तींना सहज फिरता यावे यासाठी सरकारने सुरु केलेल्या सुगम्य भारत अभियानाची पंतप्रधानांनी माहिती दिली.

अत्याधुनिक प्रवासी सुविधा असलेली महामना एक्सप्रेस सुरु केल्याबद्दल त्यांनी रेल्वेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला येणाऱ्या काही दिव्यांग लाभार्थींच्या बसला झालेल्या अपघाताबाबत त्यांनी माहिती दिली. मंत्री आणि अधिकारी रुग्णालयात पोहोचले असून जखमींची काळजी घेण्यात येईल असे पंतप्रधान म्हणाले. किरकोळ दुखापत होऊनही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींची त्यांनी भेट घेतली.

S.Kane/S.Tupe/M.Desai