Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला ज्ञानवर्धक संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांच्याशी एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक संवाद साधला. तीन तास चाललेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांचे बालपण, त्यांनी हिमालयात घालवलेले सुरुवातीची वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवास यासह विविध विषयांवर चर्चा झाली. प्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतचा हा बहुप्रतिक्षित तीन तासांचा पॉडकास्ट उद्या 16 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. लेक्स फ्रिडमन यांनी या संभाषणाचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील “सर्वात शक्तिशाली संभाषणांपैकी एक” असे केले आहे.

आगामी पॉडकास्टबद्दल लेक्स फ्रिडमन यांच्या एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशाला प्रतिसाद देताना मोदी यांनी एक्स वर लिहिले;

“@lexfridman सोबतचा हा खरोखरच एक आकर्षक संवाद होता, ज्यामध्ये माझे बालपण, हिमालयातील वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

ऐका आणि या संवादाचा भाग व्हा!”

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com