Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

पंतप्रधानांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद


नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे:

“लक्षद्वीपमधील केन्द्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून आनंद झाला. महिलांच्या एका गटाने त्यांच्या स्वयंसहाय्यता गटाने उपाहारगृह सुरू करण्याच्या दिशेने कसे काम केले, कशा प्रकारे त्या स्वावलंबी झाल्या याबद्दल सांगितले; एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की आयुष्मान भारतमुळे, हृदयविकारावर उपचार करण्यात कशी मदत झाली. आणि पीएम-किसानमुळे एका महिला शेतकऱ्याचे जीवन कसे बदलले. इतरांनी मोफत रेशन, दिव्यांगांसाठी लाभ, पीएम-आवास, किसान क्रेडिट कार्ड, उज्ज्वला योजना आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. विकासाची फळे अगदी दुर्गम भागातही वेगवेगळ्या वर्गातील लोकांपर्यंत पोहोचताना पाहणे खरोखरच समाधानकारक आहे”.

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai