Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी यानगोन येथे भारतीय समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी यानगोन येथे भारतीय  समुदायाला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यानगोन, म्यानमार येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

“तुम्ही हजारो वर्षांपासून उभय देशांची संस्कृती आणि नागरिकता, भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा तसेच भारत आणि म्यानमारमधील बंधू-भगिनींच्या आकांक्षा आणि कामगिरीचे प्रतिनिधित्व करत आहात”, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले. पंतप्रधान यावेळी म्यानमारच्या समृध्द अध्यात्मिक वारश्याबद्दल विस्ताराने बोलले.

पंतप्रधान म्हणाले, भारतीय जनसमुदाय हे भारताचे “राष्ट्र-दूत” आहेत. “योग”ला वैश्विक मान्यता मिळणे हे या जनसमुदायाचे यश आहे ज्यांनी “योग” ला जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचवले.

“जेव्हा मी तुम्हाला भेटलो, तेव्हा मला असे वाटले की परदेशात राहणाऱ्या आपल्या लोकांशी मी संवाद साधत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

“आम्ही फक्त आपल्या देशात सुधारणा घडवत नाही तर आम्ही परिवर्तन करत आहोत”, असे सांगत पंतप्रधान ठामपणे म्हणाले की, भारत आता गरिबी, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि जातीयवादापासून मुक्त होत आहे.
पंतप्रधान म्हणाले, भारतातील केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करत आहे. चांगल्या पायाभूत सुविधा या केवळ रस्ते आणि रेल्वे पुरत्या मर्यादित नाहीत यामध्ये समाजात दर्जात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पैलूंचा देखील समावेश आहे. सरकार कठीण निर्णय घ्यायला कचरत नाही असेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण देशभरात जीएसटीची एक नवीन संस्कृती उदयाला येत आहे. ते म्हणाले भारतीय नागरिकांना विश्वास आहे की भारतात परिवर्तन घडेल आणि आपल्या समाजव्यवस्थेत शिरकाव केलेल्या दृष्ट प्रवृत्तींचा आपण बिमोड करु.

उभय देशातील लोकांचे एकमेकांसोबत असलेले संबंध हेच भारत-म्यानमार संबंधांची शक्ती आहे.

याप्रसंगी यानगोन प्रदेशाचे मुख्यमंत्री फ्यो मिन थेईन उपस्थित होते.

*****

B.Gokhale/S.Mhatre/Anagha