नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत मेट्रो रेल्वेच्या गुंदवली ते मोगरा या स्थानाकांदरम्यान मेट्रो गाडीमधून प्रवास केला. त्यांनी मुंबई 1 मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा शुभारंभ केला, आणि या वेळी आयोजित मेट्रो फोटो प्रदर्शन आणि त्रिमिती मॉडेलला भेट दिली. मेट्रोच्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी आणि मेट्रोच्या बांधकामात सहभागी असलेल्या श्रमिकांशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:
“पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो मध्ये.”
PM @narendramodi on board the Metro in Mumbai. pic.twitter.com/nE03O7nDmW
— PMO India (@PMOIndia) January 19, 2023
त्यापूर्वी आज पंतप्रधानांनी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2अ आणि 7 चे लोकार्पण केले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास प्रकल्प आणि सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी केली, 20 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उदघाटन केले, आणि मुंबईमधील सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात केली.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा शुभारंभ केला. या अॅपमुळे प्रवास सुलभ होईल, मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारावर ते दाखवता येईल आणि त्याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरता येईल, आणि त्यानंतर उपनगरी रेल्वे आणि बसेस यासह अन्य सार्वजनिक परिवहन सेवांसाठीही त्याचा विस्तार केला जाईल. प्रवाशांना अनेक कार्ड्स अथवा रोख रक्कम बाळगावी लागणार नाही, एनसीएमसी कार्ड जलद, संपर्करहित, डिजिटल व्यवहार पुरवेल, ज्यामुळे अखंड अनुभवाची प्रक्रिया सुलभ होईल.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
PM @narendramodi on board the Metro in Mumbai. pic.twitter.com/nE03O7nDmW
— PMO India (@PMOIndia) January 19, 2023
On board the Metro, which will boost ‘Ease of Living’ for the people of Mumbai. pic.twitter.com/JG4tHwAAXA
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023