नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील करहल मधील श्योपूर येथे आयोजित बचत गट मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी, पंतप्रधानांनी पीएम कौशल विकास योजनेंतर्गत चार विशेषत: वंचित आदिवासी गट (पीव्हीटीजी) कौशल केंद्रांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांनी बचत गटातील सदस्यांना बँक कर्ज मंजुरीची पत्रे सुपूर्द केली आणि जल जीवन मिशन अंतर्गत किट देखील त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या सुमारे एक लाख महिला सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होत्या आणि सुमारे 43 लाख महिला विविध केंद्रांवरून आभासी माध्यमातून कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या होत्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अवधी मिळाला तर ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईकडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. आज आईला भेटायला जाऊ शकलो नसलो तरी लाखो आदिवासी मातांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असल्याचा आनंद आईला असेल असे ते म्हणाले. ते म्हणाले, भारताच्या कन्या आणि माता या माझ्या ‘रक्षा कवच’ (संरक्षणात्मक कवच) आहेत. विश्वकर्मा जयंतीनिमित्त बचतगटांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन ही विशेष बाब असल्याचे सांगून त्यांनी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
पंचाहत्तर वर्षांनंतर चित्ता भारतात परतल्याबद्दल पंतप्रधानांनी सार्थ अभिमान आणि आनंद व्यक्त केला. त्यांनी संगितले, “इथे येण्यापूर्वी मला कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ते सोडण्याचा बहुमान मिळाला.” चित्ता ज्यांचा उल्लेख त्यांनी सन्माननीय अतिथी म्हणून केला आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांच्या विनंतीवरून उभे राहून टाळ्यांनी स्वागत केले. “तुमच्यावर विश्वास असल्यामुळे चित्ते तुमच्या स्वाधीन केले आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सर्व संकटांना तोंड द्याल पण चित्त्याला कोणतीही हानी पोहोचू देणार नाही. म्हणूनच आज मी या आठ चित्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपवायला आलो आहे.”, असे त्यांनी तेथील जनतेला सांगितले. बचत गटांद्वारे आज करण्यात आलेल्या 10 लाख रोपांच्या लागवडीची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की यामुळे भारताच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळेल.
भारतातील महिलांच्या वाढत्या प्रतिनिधित्वावर प्रकाश टाकत, महिला शक्ती ही गेल्या शतकातील भारत आणि या शतकातील नवीन भारत यांच्यातील अंतर स्पष्ट करणारा घटक बनली आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आजच्या नव्या भारतात महिला शक्तीचा झेंडा पंचायत भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत फडकत आहे”, असेही मोदी म्हणाले. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत 17 हजार महिला, पंचायतींमधे निवडून आल्याचे त्यांनी नमूद करत हे मोठ्या बदलाचे लक्षण आहे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या सुरक्षेत महिलांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण पंतप्रधानांनी केले. नुकत्याच झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेतील महिला आणि बचत गटांच्या भूमिकेचे आणि कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. बचतगट अर्थात ‘स्वयं सहाय्यता गट’ हे कालांतराने ‘राष्ट्रीय मदत गट’ बनले असे ते म्हणाले. कोणत्याही क्षेत्रातील यशाचा थेट संबंध महिलांचे प्रतिनिधीत्व किती वाढले आहे याच्याशी असतो, असे पंतप्रधान म्हणाले . या प्रारुपाचे उत्तम उदाहरण म्हणजे महिलांनी नेतृत्व केलेल्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाचे यश. त्याचप्रमाणे, गेल्या तीन वर्षांत भारतात 7 कोटी कुटुंबांना नळ जोडणी मिळाली असून त्यापैकी 40 लाख कुटुंबे मध्य प्रदेशातील आहेत. या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी भारतातील महिलांना दिले.
गेल्या 8 वर्षांत सरकारने बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आज देशभरातील 8 कोटींहून अधिक भगिनी या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील किमान एका भगिनीने या मोहिमेत सहभागी व्हावे, हे आमचे ध्येय आहे,” अशी टिप्पणी मोदींनी केली.
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमावर प्रकाश टाकत, प्रत्येक जिल्ह्यातून स्थानिक उत्पादने मोठ्या बाजारपेठेत नेण्याचा हा प्रयत्न आहे असे पंतप्रधान म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. बचत गटांनी, खास त्यांच्या उत्पादनांसाठी तयार केलेल्या बाजारपेठांमध्ये 500 कोटी रुपयांची उत्पादने विकली आहेत. पीएम वन धन योजना आणि पीएम कौशल विकास योजनेचे लाभ महिलांपर्यंत पोहोचत आहेत असे त्यांनी सांगितले. जीईएम पोर्टलवर बचतगटांच्या उत्पादनासाठी ‘सरस’ बाबतचीही माहिती पंतप्रधानांनी दिली.
भारताने संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत त्याद्वारे 2023 हे वर्ष भरड धान्यांचे वर्ष म्हणून घोषित झाले आहे. हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे केले जाणार आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. सप्टेंबर महिना हा देशात पोषण महिना म्हणून साजरा केला जात असल्याची आठवणही पंतप्रधानांनी करुन दिली. परदेशी मान्यवरांच्या भेटीदरम्यानच्या अल्पोपहारात भरड धान्याने तयार केलेला किमान एक पदार्थ असावा याची खातरजमा करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
2014 पासून सरकार करत असलेल्या प्रयत्नांची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, देशाने महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील आव्हाने सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे.
स्वच्छतागृहांचा अभाव आणि स्वयंपाकघरात लाकडामुळे होणाऱ्या धुराचा त्रास, यामुळे महिलांना कशाप्रकारे अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत होता, याची मोदींनी आठवण करुन दिली. देशात 11 कोटींहून अधिक शौचालये बांधून, 9 कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस जोडणी देऊन आणि भारताच्या दुर्गम भागांतील कोट्यवधी कुटुंबांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे जीवन सुकर झाले आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मातृ वंदना योजनेंतर्गत 11000 कोटी रुपये गरोदर मातांच्या खात्यात थेट जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मध्य प्रदेशातील मातांनाही या योजनेंतर्गत 1300 कोटी रुपये मिळाले. घरांच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांच्या वाढत्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
जन धन बँक खात्यांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जन धन खाती देशातील महिला सक्षमीकरणाचे मोठे माध्यम बनले आहे. कोरोना काळात, जनधन बँक खात्यांमुळेच सरकार महिलांच्या बँक खात्यांमध्ये सुरक्षितपणे आणि थेट पैसे जमा करू शकले, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. “आज पीएम आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांच्या मालकी हक्कात महिलांच्या नावांचा समावेश केला जात आहे. आमच्या सरकारने देशातील 2 कोटींहून अधिक महिलांना घरमालक बनण्यास सक्षम केले आहे. मुद्रा योजनेंतर्गत, देशभरातील लघु उद्योग आणि व्यवसायांना आतापर्यंत 19 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यातील सुमारे 70 टक्के रक्कम महिला उद्योजकांना मिळाली आहे. सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे आज घरातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे याचा मला आनंद आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
“महिलांचे आर्थिक सक्षमीकरण त्यांना समाजात पुरुषांइतकेच सक्षम बनवते,” अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारतातील मुली आता मोठ्या संख्येने सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत, पोलीस, कमांडो बनत आहेत आणि लष्करातही सामील होत आहेत, याचे सर्व श्रेय महिलांसाठी संधीची बंद दारे उघडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करणाऱ्या सरकारचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशात गेल्या 8 वर्षात प्रत्येक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय बदलांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत, देशभरातील पोलीस दलात महिलांची संख्या 1 लाखावरून वाढून 2 लाखांहून अधिक झाली आहे याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. देशातील 35 हजारांहून अधिक मुली आता केंद्रीय दलाचा भाग बनल्या असून त्या देशाच्या शत्रूंविरुद्ध लढत आहेत असेही पंतप्रधान म्हणाले. “8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान पुढे म्हणाले, “मला आपल्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास आहे. सबका प्रयासचे अनुसरण करत मजबूत राष्ट्र आणि विकसित समाजाच्या निर्मितीत आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार तसेच केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल हे याप्रसंगी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत सुरु झालेल्या हजारो महिला बचत गटाच्या (SHG) सदस्य / सामुदायिक रिसोर्स पर्सन या संमेलनाला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत चार विशेषत्वाने वंचित असलेल्या आदिवासी गटांच्या (PVTG) कौशल्य केंद्रांचे उद्घाटन केले.
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे (DAY-NRLM) मुख्य उद्दिष्ट ग्रामीण गरीब कुटुंबांना टप्प्याटप्प्याने बचत गटात (SHGs) एकत्रित करणे आणि उपजीविका साधनात वैविध्य आणत त्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना दीर्घकालीन मदत प्रदान करणे हे आहे. कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शिक्षण आणि लिंगाधारित भेदभाव, पोषण, स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयांवर जागरूकता निर्माण आणि वर्तन बदल संवादाद्वारे महिला बचतगट (SHG) सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
मध्य प्रदेश के श्योपुर में ‘स्वयं सहायता समूह सम्मेलन’ में लोगों के स्नेह से अभिभूत हूं। https://t.co/SrCMkZWKJn
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2022
विश्वकर्मा जयंती पर स्वयं सहायता समूहों का इतना बड़ा सम्मेलन, अपने आप में बहुत विशेष है।
मैं आप सभी को, सभी देशवासियों को विश्वकर्मा पूजा की भी शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi in Sheopur, Madhya Pradesh
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
मुझे आज इस बात की भी खुशी है कि भारत की धरती पर अब 75 साल बाद चीता फिर से लौट आया है।
अब से कुछ देर पहले मुझे कुनो नेशनल पार्क में चीतों को छोड़ने का सौभाग्य मिला: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
पिछली शताब्दी के भारत और इस शताब्दी के नए भारत में एक बहुत बड़ा अंतर हमारी नारी शक्ति के प्रतिनिधित्व के रूप में आया है।
आज के नए भारत में पंचायत भवन से लेकर राष्ट्रपति भवन तक नारीशक्ति का परचम लहरा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
जिस भी सेक्टर में महिलाओं का प्रतिनिधित्व बढ़ा है, उस क्षेत्र में, उस कार्य में सफलता अपने आप तय हो जाती है।
स्वच्छ भारत अभियान की सफलता इसका बेहतरीन उदाहरण है, जिसको महिलाओं ने नेतृत्व दिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
पिछले 8 वर्षों में स्वयं सहायता समूहों को सशक्त बनाने में हमने हर प्रकार से मदद की है।
आज पूरे देश में 8 करोड़ से अधिक बहनें इस अभियान से जुड़ी हैं।
हमारा लक्ष्य है कि हर ग्रामीण परिवार से कम से कम एक बहन इस अभियान से जुड़े: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
गांव की अर्थव्यवस्था में, महिला उद्यमियों को आगे बढ़ाने के लिए, उनके लिए नई संभावनाएं बनाने के लिए हमारी सरकार निरंतर काम कर रही है।
‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट’ के माध्यम से हम हर जिले के लोकल उत्पादों को बड़े बाज़ारों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
सितंबर का ये महीना देश में पोषण माह के रूप में मनाया जा रहा है।
भारत की कोशिशों से संयुक्त राष्ट्र ने वर्ष 2023 को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोटे अन्नाज के वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
देश में 11 करोड़ से ज्यादा शौचालय बनाकर, 9 करोड़ से ज्यादा उज्जवला के गैस कनेक्शन देकर और करोड़ों परिवारों में नल से जल देकर, आपका जीवन आसान बनाया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
महिलाओं का आर्थिक सशक्तिकरण उन्हें समाज में भी उतना ही सशक्त करता है।
हमारी सरकार ने बेटियों के लिए बंद दरवाजे को खोल दिया है।
बेटियां अब सैनिक स्कूलों में भी दाखिला ले रही हैं, पुलिस कमांडो भी बन रही हैं और फौज में भी भर्ती हो रही हैं: PM
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
* * *
N.Chitale/Vasanti/Vinayak/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
मध्य प्रदेश के श्योपुर में 'स्वयं सहायता समूह सम्मेलन' में लोगों के स्नेह से अभिभूत हूं। https://t.co/SrCMkZWKJn
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2022
विश्वकर्मा जयंती पर स्वयं सहायता समूहों का इतना बड़ा सम्मेलन, अपने आप में बहुत विशेष है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
मैं आप सभी को, सभी देशवासियों को विश्वकर्मा पूजा की भी शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi in Sheopur, Madhya Pradesh
मुझे आज इस बात की भी खुशी है कि भारत की धरती पर अब 75 साल बाद चीता फिर से लौट आया है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
अब से कुछ देर पहले मुझे कुनो नेशनल पार्क में चीतों को छोड़ने का सौभाग्य मिला: PM @narendramodi
पिछली शताब्दी के भारत और इस शताब्दी के नए भारत में एक बहुत बड़ा अंतर हमारी नारी शक्ति के प्रतिनिधित्व के रूप में आया है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
आज के नए भारत में पंचायत भवन से लेकर राष्ट्रपति भवन तक नारीशक्ति का परचम लहरा रहा है: PM @narendramodi
जिस भी सेक्टर में महिलाओं का प्रतिनिधित्व बढ़ा है, उस क्षेत्र में, उस कार्य में सफलता अपने आप तय हो जाती है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
स्वच्छ भारत अभियान की सफलता इसका बेहतरीन उदाहरण है, जिसको महिलाओं ने नेतृत्व दिया है: PM @narendramodi
पिछले 8 वर्षों में स्वयं सहायता समूहों को सशक्त बनाने में हमने हर प्रकार से मदद की है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
आज पूरे देश में 8 करोड़ से अधिक बहनें इस अभियान से जुड़ी हैं।
हमारा लक्ष्य है कि हर ग्रामीण परिवार से कम से कम एक बहन इस अभियान से जुड़े: PM @narendramodi
गांव की अर्थव्यवस्था में, महिला उद्यमियों को आगे बढ़ाने के लिए, उनके लिए नई संभावनाएं बनाने के लिए हमारी सरकार निरंतर काम कर रही है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
'वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट' के माध्यम से हम हर जिले के लोकल उत्पादों को बड़े बाज़ारों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं: PM @narendramodi
सितंबर का ये महीना देश में पोषण माह के रूप में मनाया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
भारत की कोशिशों से संयुक्त राष्ट्र ने वर्ष 2023 को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोटे अन्नाज के वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है: PM @narendramodi
2014 के बाद से ही देश, महिलाओं की गरिमा बढ़ाने, महिलाओं के सामने आने वाली चुनौतियों के समाधान में जुटा हुआ है।
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
शौचालय के अभाव में जो दिक्कतें आती थीं, रसोई में लकड़ी के धुएं से जो तकलीफ होती थी, वो आप अच्छी तरह जानती हैं: PM @narendramodi