Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भूषविले 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद

पंतप्रधानांनी भूषविले  13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आभासी माध्यमातून आयोजित 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य ही भारताने निवडलेली  शिखर परिषदेची संकल्पना होती.

या शिखर परिषदेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे अन्य सर्व ब्रिक्स नेते सहभागी झाले होते.

 

यावर्षी भारताच्या अध्यक्षते दरम्यान ब्रिक्स भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.  ज्यामुळे अनेक नवीन उपक्रम साध्य झाले.यात पहिली ब्रिक्स डिजिटल आरोग्य शिखर परिषद; बहुपक्षीय सुधारणांवरील पहिले ब्रिक्स मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन; ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती आराखडा ; रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या क्षेत्रातील सहकार्यावरील करार; आभासी ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र; हरित पर्यटनाबाबतची  ब्रिक्स आघाडी इत्यादींचा यात समावेश आहे.

 कोविड पश्चात  जागतिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ब्रिक्स देश महत्वाची भूमिका बजावू शकतात हे प्रामुख्याने अधोरेखित करत पंतप्रधानांनी ;’लवचिक , नाविन्यपूर्ण , विश्वासार्ह आणि शाश्वत पुर्नउभारणी’ या ब्रीदवाक्याखाली ब्रिक्स सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

या संकल्पनेवर विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी,  लसीकरणाची गती आणि सुलभता वाढवून ‘पुर्नउभारणी’ वाढवण्याच्या गरजेवर, विकसित देशांच्या पलीकडे औषध निर्माण  आणि लस उत्पादन क्षमता वैविध्यपूर्ण करून ‘लवचिकता’ निर्माण करणे, सार्वजनिक हितासाठी डिजिटल साधनांचा कल्पकतेने वापर करून ‘नवोन्मेषा’ला प्रोत्साहन देणे,विश्वासार्हता’ वाढवण्यासाठी बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे आणि पर्यावरण आणि हवामानाच्या समस्यांवर ब्रिक्सचा एकमुखी आवाज स्पष्ट करून ‘शाश्वत’ विकासाला  प्रोत्साहन देणे यावर भर दिला.

 

या नेत्यांनी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींसह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली. दहशतवाद आणि कट्टरतावाद वाढल्यामुळे  निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल या परिषदेत समान मते मांडण्यात आली आणि दहशतवादविरोधी ब्रिक्स कृती आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी सर्व ब्रिक्स भागीदारांनी सहमती दर्शवली.

 

शिखर परिषदेच्या समारोपाच्यावेळी नेत्यांनी ‘नवी दिल्ली घोषणापत्र ‘ स्वीकारले. 

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com