Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बहारिनचे महामहिम युवराज आणि पंतप्रधान सलमान बिन हमद यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा


नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारिनचे युवराज आणि पंतप्रधान सलमान बिन हमद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युवराज सलमान यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा कळवल्या.

भारत आणि बहारिन यांच्यामधील द्विपक्षीय संबंधाचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला आणि हे संबंध राजकारण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा आणि जनतेमधील संबंध या सर्व स्तरांवर विकास पावत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. 2021-22 हे वर्ष दोन्ही देशांमधील परराष्ट्र संबंधांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

पंतप्रधानांनी बहारिनमधील भारतीय समुदायाची कोविड महामारीच्या कालखंडात उत्कृष्टपणे काळजी घेतल्याबद्दल तसेच भारतीय समुदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांची पूर्तता केल्याबद्दल बहारिनच्या नेतृत्वाचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम राजे हमद बिन इसा अल खलिफा यांना शुभेच्छा कळवल्या. तसेच महामहीम युवराज सलमान बिन हमद अल खलिफा यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com