Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी प. बंगालमधल्या जलपायगुडीला भेट दिली

पंतप्रधानांनी प. बंगालमधल्या जलपायगुडीला भेट दिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जलपायगुडीला भेट दिली. राष्ट्रीय महामार्ग 31 डी च्या फलाकाता-सलसलाबारी भागाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली. तसेच उच्च न्यायालयाच्या नवीन पीठाचे उद्‌घाटन त्यांनी केले.

फलाकाता-सलसलाबारी हा 41.7 कि.मी. लांबीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा भाग आहे. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्त्वावर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पामुळे सलसलाबारी आणि अलिपूरदुआर ते सिलीगुडी हे अंतर 50 कि.मी. ने कमी होईल.

जलपायगुडी येथील कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमुळे उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपायगुडी आणि कुच बिहारच्या जनतेला जलदगतीने न्याय मिळू शकेल. सध्या या चार जिल्ह्यातल्या नागरिकांना 600 कि.मी. अंतरावरील कलकत्ता उच्च न्यायालयात जावे लागते. या पीठामुळे हे अंतर 100 कि.मी. पर्यंत कमी होईल.

B.Gokhale/S.Kane/P.Kor