Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे मॉरिशसचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले


मॉरिशसच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन अभिनंदन केले.

दूरध्वनी केल्याबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी भारत आणि मॉरिशस दरम्यानचे काळाच्या कसोटीला उतरलेले विशेष संबंध अधिक दृढ करण्याबाबत कटिबध्दता दर्शवली.

भारत आणि मॉरिशस दरम्यान मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मावळते पंतप्रधान सर अनिरुध्द जगन्नाथ यांनी दिलेल्या योगदानाची आणि त्यांच्या नेतृत्वाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

B.Gokhale/S.Kane/Anagha