नवी दिल्ली, 30 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे इतर अनेक सदस्य आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “दररोज नवा संघर्ष, दररोज नवी आव्हाने. आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे , त्या आपल्यासोबत असलेल्या मुलांचे दुःख शब्दात मांडणे खूप कठीण आहे,” असे पंतप्रधानांनी मुलांना सांगितले. मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे ते म्हणाले.
अशा परिस्थितीत, “आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्या पाठीशी आहे या वस्तुस्थितीचेही पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन हे एक प्रतिबिंब आहे ” असे पंतप्रधान म्हणाले. जर कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत करेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य योजनांद्वारे दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महामारीच्या सर्वात वेदनादायक परिणामांना इतक्या धैर्याने तोंड दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मुलांना सलाम केला आणि सांगितले की पालकांच्या प्रेमाची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. “या कठीण काळात भारतमाता तुम्हा सर्व मुलांसोबत आहे”. पीएम केअर फॉर चिल्ड्रेनच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी महामारीच्या काळातली मानवी दयाळूपणाची उदाहरणे सांगितली, विशेषत: बाधित लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी कसे योगदान दिले. कोरोना काळात रुग्णालये उभारणे , व्हेंटिलेटर खरेदी करणे आणि ऑक्सिजन संयंत्र उभारणे यासाठीही या निधीची मोठी मदत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले, तसेच अनेक कुटुंबांचे भवितव्यही वाचू शकले.
निराशेच्या गडद वातावरणातही , जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रकाशाचा किरण नक्कीच दिसतो, असे पंतप्रधान म्हणाले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या देशाचा उल्लेख केला. निराशेचे रूपांतर पराभवात होऊ देऊ नका, असा सल्ला पंतप्रधानांनी मुलांना दिला. त्यांनी मुलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे ऐकायला सांगितले. या कठीण काळात चांगली पुस्तकेच त्यांचे विश्वासू मित्र बनू शकतात, असेही ते म्हणाले. त्यांनी मुलांना निरोगी राहण्यास सांगितले तसेच खेळांमध्ये सहभागी होऊन खेलो इंडिया आणि फिट इंडिया चळवळीचे नेतृत्व करण्यास सांगितले. तसेच योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी होण्यास सांगितले. ते म्हणाले की, नकारात्मकतेच्या त्या वातावरणात भारताचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास होता. “आम्ही आपल्या शास्त्रज्ञांवर, आपल्या डॉक्टरांवर आणि आपल्या तरुणांवर विश्वास ठेवला. आणि आपण जगासाठी चिंता न बनता आशेचा किरण म्हणून उदयाला आलो. आपण समस्या बनलो नाही तर त्यावर तोडगा उपलब्ध करून देणारा बनलो. आपण जगभरातील देशांमध्ये औषधे आणि लस मात्रा पाठवल्या. एवढ्या मोठ्या देशातही, आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवली,” ते म्हणाले. आपला देश वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल करत आहे आणि जग आपल्याकडे नव्या आशेने आणि विश्वासाने पाहत आहे, असे ते म्हणाले.
आज जेव्हा आमचे सरकार 8 वर्षे कार्यकाळ पूर्ण करत आहे, तेव्हा देशाचा विश्वास, देशवासियांचा स्वतःवरचा विश्वास अभूतपूर्व आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरत असलेल्या दहशतवादी संघटना आणि प्रादेशिक भेदभाव या दुष्टचक्रात देश 2014 पूर्वी अडकला होता , त्यातून आता बाहेर पडत आहे. “ही घटना देखील तुम्हा मुलांसाठी एक उदाहरण आहे. सर्वात कठीण दिवसही निघून जातात,” असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत मिशन, जन धन योजना किंवा हर घर जल अभियान यांसारख्या कल्याणकारी धोरणांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की सरकार सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेने वाटचाल करत आहे. मागील 8 वर्षे गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी समर्पित होती असे त्यांनी सांगितले. “कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने आम्ही अडचणी कमी करण्याचा आणि देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सरकारने गरीबांचे हक्क सुनिश्चित केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता सरकारच्या योजनांचा लाभ आपल्याला नक्की मिळेल, निरंतर मिळत राहील असा विश्वास गरीबातील गरीब व्यक्तीला वाटत आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी आमचे सरकार आता 100% सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहे.
गेल्या आठ वर्षांत भारताने जी उंची गाठली आहे, त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती , असे पंतप्रधान म्हणाले. आज जगभरात भारताचा गौरव वाढला आहे, जागतिक मंचावर आपल्या भारताची ताकद वाढली आहे. भारताच्या या प्रवासाचे नेतृत्व युवाशक्ती करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “तुम्ही तुमचे आयुष्य केवळ तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित करा, ती पूर्ण होणारच आहेत”, असे सांगून पंतप्रधानांनी समारोप केला
मैं जानता हूं कोरोना की वजह से जिन्होंने अपनों को खोया है, उनके जीवन में आया ये बदलाव कितना मुश्किल है।
हर दिन का संघर्ष, हर दिन की तपस्या।
आज जो बच्चे हमारे साथ हैं, जिनके लिए ये कार्यक्रम हो रहा है, उनकी तकलीफ शब्दों में कहना मुश्किल है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
PM CARES for Children, आप सभी ऐसे कोरोना प्रभावित बच्चों की मुश्किलें कम करने का एक छोटा सा प्रयास है, जिनके माता और पिता, दोनों नहीं रहे।
PM CARES for children इस बात का भी प्रतिबिंब है कि हर देशवासी पूरी संवेदनशीलता से आपके साथ है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
अगर किसी को प्रॉफेशनल कोर्स के लिए, हायर एजुकेशन के लिए एजुकेशन लोन चाहिए होगा, तो PM-CARES उसमें भी मदद करेगा।
रोजमर्रा की दूसरी जरूरतों के लिए अन्य योजनाओं के माध्यम से उनके लिए 4 हजार रुपए हर महीने की व्यवस्था भी की गई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
इस फंड ने कोरोनाकाल के दौरान अस्पताल तैयार करने में, वेंटिलेटर्स खरीदने में, ऑक्सिजन प्लांट्स लगाने में भी बहुत मदद की।
इस वजह से कितने ही लोगों का जीवन बचाया जा सका, कितने ही परिवारों का भविष्य बचाया जा सका: PM @narendramodi at launch of PM-CARES for Children Scheme
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
निराशा के बड़े से बड़े माहौल में भी अगर हम खुद पर भरोसा करें तो प्रकाश की किरण अवश्य दिखाई देती है।
हमारा देश तो खुद ही इसका सबसे बड़ा उदाहरण है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
नकारात्मकता के उस माहौल में भारत ने अपने सामर्थ्य पर भरोसा किया।
हमने अपने वैज्ञानिकों, डॉक्टर्स, अपने युवाओं पर भरोसा किया।
और, हम दुनिया के लिए चिंता नहीं बल्कि उम्मीद की किरण बनकर निकले।
हम Problem नहीं बने बल्कि हम Solution देने वाले बने: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
हमने दुनिया भर के देशों को दवाइयाँ भेंजी, वैक्सीन्स भेजीं।
अपने इतने बड़े देश में भी हम हर एक नागरिक तक वैक्सीन लेकर गए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
आज जब हमारी सरकार अपने 8 वर्ष पूरे कर रही है तो देश का आत्मविश्वास, देशवासियों का खुद पर भरोसा अभूतपूर्व है।
भ्रष्टाचार, हजारों करोड़ के घोटाले, भाई-भतीजावाद, देशभर में फैल रहे आतंकी संगठन, क्षेत्रीय भेदभाव, जिस कुचक्र में देश 2014 से पहले फंसा हुआ था उससे बाहर निकल रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
टेक्नोलॉजी का इस्तेमाल बढ़ाकर हमारी सरकार ने गरीब को उसके अधिकार सुनिश्चित किए हैं।
अब गरीब से गरीब को भरोसा है कि सरकार की योजनाओं का लाभ उसे मिलेगा, निरंतर मिलेगा।
इस भरोसे को बढ़ाने के लिए ही हमारी सरकार अब शत प्रतिशत सशक्तिकरण का अभियान चला रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
बीते आठ वर्षों में भारत ने जो ऊंचाई हासिल की है, वो पहले कोई सोच भी नहीं सकता था।
आज दुनिया में भारत की आन-बान-शान बढ़ी है, वैश्विक मंचों पर हमारे भारत की ताकत बढ़ी है।
और मुझे खुशी है कि भारत की इस यात्रा का नेतृत्व युवा शक्ति ही कर रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 30, 2022
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
PM-CARES for Children Scheme will support those who lost their parents to Covid-19 pandemic. https://t.co/p42sktb6xz
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2022

PM Cares for Children, कोरोना प्रभावित उन बच्चों की मुश्किलें कम करने का एक छोटा सा प्रयास है, जिनके माता और पिता, दोनों नहीं रहे। यह इस बात का भी प्रतिबिंब है कि हर देशवासी पूरी संवेदनशीलता से इन बच्चों के साथ है। pic.twitter.com/Ap9FzjEEGl
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2022
PM-Cares में हमारे करोड़ों देशवासियों ने सेवा और त्याग की भावना से अपनी मेहनत और अपने पसीने की कमाई को जोड़ा है। किसी ने अपने पूरे जीवन की कमाई दान कर दी, तो किसी ने अपने सपनों के लिए जोड़ी गई पूंजी इसमें लगा दी। pic.twitter.com/kG9Y065Xub
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2022
कोरोना की आपदा के बीच ही हमने ‘आत्मनिर्भर भारत’ जैसे संकल्प की शुरुआत की, और आज ये संकल्प तेजी से सिद्धि की तरफ बढ़ रहा है। विश्व हमें आज एक नई उम्मीद से, नए भरोसे से देख रहा है। pic.twitter.com/efNDkdwtLn
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2022