Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय सृजक  पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय सृजक  पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक  पुरस्कार प्रदान केला. विजेत्यांशीही त्यांनी संवाद साधला. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

न्यू इंडिया चॅम्पियनगटात अभि अँड न्यू यांना पुरस्कार देण्यात आला. रोकडी तथ्ये सादर करताना ते त्यांच्या प्रेक्षकांची आवड कशी जपतात याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सादरीकरणाच्या पद्धतीप्रमाणे, जर तथ्ये उर्जेसह सादर केली गेली तर प्रेक्षक ती स्वीकारतात. आव्हानात्मक परंतु अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र हाती घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.

कीर्ती हिस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तिका गोविंदसामीला सर्वोत्कृष्ट कथाकथनाचा पुरस्कार मिळाला. जेव्हा त्यांनी पंतप्रधानांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा पंतप्रधानांनीही त्यांचे अनुकरण केले. कला क्षेत्रात पायांना स्पर्श करणे वेगळे परंतु वैयक्तिकरित्या जेव्हा मुलगी त्यांच्या पायांना स्पर्श करते तेव्हा ते अस्वस्थ होतात असे ते म्हणाले. हिंदीच्या मर्यादांबद्दल कार्तिकी यांनी सांगितले असता, पंतप्रधानांनी त्यांना कोणत्याही पसंतीच्या भाषेत बोलण्यास सांगितले कारण हा एक विशाल देश आहे आणि तुमचे बोल या महान भूमीच्या किमान एका कोपऱ्यात तरी  ऐकले जातील.’. असे ते म्हणाले.महान तामीळ भाषेचा गुणगौरव केल्याबद्दल आणि तिचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली. त्यांनी पंतप्रधानांना इतिहास आणि राजकारणाच्या परस्परावलंबी स्वरूपाबद्दल सांगितले आणि परिणामी समाज माध्यमांमध्ये यावर अधूनमधून प्रतिक्रिया उमटत होत्या असेही म्हटले. पंतप्रधानांनी विचारल्याप्रमाणे, आजच्या किशोरवयीन प्रेक्षकांना भारताच्या महानतेबद्दल जाणून घेणे आवडते, असे त्या म्हणाल्या.

आपल्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे, नावीन्यपूर्ण आशय निर्माण करणे यासाठी दिला जाणारा डिसरप्टर ऑफ द इयरपुरस्कार रणवीर अलाहाबादिया यांना प्रदान  करण्यात आला. पंतप्रधानांनी रणवीर यांना कमी झोपेबद्दल जागरूकता निर्माण करण्याची सूचना केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते फक्त काही तास झोपत आहेत याचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी योग निद्रेच्या लाभाबाबतही भाष्य केले. यशाबद्दल रणवीरचे त्यांनी अभिनंदन केले.

इस्रोमधील माजी शास्त्रज्ञ, अहमदाबाद येथील पंक्ती पांडे यांना मिशन लाईफचा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रीन चॅम्पियन पुरस्कार मिळाला. पंतप्रधानांनी यावेळी अहमदाबादमधे  लोकप्रिय असलेली आख्यायिका  सांगितली त्याला गर्दीतून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. लोकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, शून्य कचऱ्याचे उद्दीष्ट ठेवून घरातून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे कचरापरिक्षण करावे अशी शिफारस पंक्ती यांनी केली.  पंतप्रधानांनी, पंक्ती यांना मिशन लाइफ बद्दल सविस्तर अभ्यास करण्यास सांगितले आणि आपले जीवन पर्यावरणपूरक बनवण्याच्या त्यांच्या आवाहनाची आठवण करून दिली.

सामाजिक परिवर्तनासाठीचा  बेस्ट  क्रिएटिव्ह फॉर सोशल चेंजचा पुरस्कार आधुनिक काळातील मीरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी यांना मिळाला.  भगवद्गीता आणि रामायणातील कथांचे त्या निरुपण करतात. कथाकारम्हणून आपला प्रवास आणि आपल्या संस्कृतीतील महाकाव्यांचे मर्मसत्व सादर करून तरुणांमध्ये त्या अध्यात्माची कशी आवड निर्माण करत आहे हे त्यांनी सांगितले. भौतिक जबाबदाऱ्या पार पाडताना अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या शक्यतेबद्दलही त्यांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी पद्धती सुधारण्याच्या कामासाठी लक्ष्य दाबासला सर्वात प्रभावशाली कृषी निर्माता पुरस्कार मिळाला. त्यांच्या वतीने त्यांच्या भावाने हा पुरस्कार स्वीकारला आणि देशात नैसर्गिक शेतीची गरज अधोरेखित केली. त्यांनी 30,000 हून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्ग आणि पिकांचे कीटक आणि किडींपासून संरक्षण करण्याबाबत प्रशिक्षण दिल्याची माहिती दिली. पंतप्रधानांनी सध्याच्या काळातील त्यांच्या विचारप्रक्रियेचे कौतुक केले आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी यांना भेटून नैसर्गिक शेतीबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनावर चर्चा करण्याचे आवाहन केले.  त्यांनी 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले आहे.  देवव्रत यांच्या युट्युब चित्रफिती राहाव्यात अशी विनंतीही त्यांनी लक्ष्य यांना केली. नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीबद्दलच्या मिथकांना दूर करण्यासाठी सहकार्य करावे असेही पंतप्रधान म्हणाले. .

अनेक भारतीय भाषांमधील मूळ गाणी, पारंपारिक लोकसंगीत सादर करणाऱ्या मैथिली ठाकूर यांना  कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला.  पंतप्रधानांच्या विनंतीवरून त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाचे भक्तिगीत सादर केले. पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात कॅसांड्रा मे स्पिटमन यांचा उल्लेख केला होता. त्या अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी, विशेषत: भक्तिगीते गातात. नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर अच्युतम केशवम आणि एक तमिळ गाणे गायले होते.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्काराचे मानकरी ठरले ते टांझानियाचे किरी पॉल, अमेरिकेचे ड्र्यू हिक्स, जर्मनीच्या  कॅसांड्रा मे स्पिटमन. ड्रू हिक्स यांनी पंतप्रधानांकडून पुरस्कार स्वीकारला. हिक्स यांच्या अस्खलित हिंदी आणि बिहारी उच्चारणामुळे भारतात समाजमाध्यमांवर  लोकप्रियता आणि भाषिक प्रतिभेला प्रसिद्धी मिळाली आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल हिक्स यांनी आनंद व्यक्त केला. लोकांना आनंद देऊन भारताचे नाव उंचावण्याची आपली इच्छा असल्याचं हिक्स यांनी प्रतिक्रियेत सांगितले. बनारस हिंदू विद्यापीठ आणि पाटण्याशी आपल्या वडिलांच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्यालाही भारतीय संस्कृतीची आवड निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. हिक्स यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. हिक्स यांचे प्रत्येक वाक्य देशातील युवकांना प्रेरणा देईल असे पंतप्रधान म्हणाले.

कर्ली टेल्सच्या कामिया जानी यांना  सर्वोत्कृष्ट  पर्यटन  निर्माता  पुरस्कार मिळाला. अन्न, प्रवास आणि जीवनशैली यावर ती भर देते. भारताचे सौंदर्य आणि विविधता यांचे दर्शन तिच्या ध्वनिचित्रफितींमधून घडते. तिने भारताच्या सौंदर्याबद्दलची मते मांडली. भारत जागतिक नकाशावर प्रथम क्रमांकावर यावा या उद्देशाने आपण काम करतो असे ती म्हणाली. लक्षद्वीप किंवा द्वारकेला जाण्याबद्दल आपण संभ्रमात आहोत असे तिने सांगितले. त्यावर द्वारकेला जाण्यासाठी तिला खूप खोलवर जावे लागेल असे  पंतप्रधानांनी म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. द्वारका शहराचे दर्शन घेण्याचा आनंद काही औरच होता असे पंतप्रधानांनी सांगितले.आदि कैलासचा अनुभव पंतप्रधानांनी सांगितला. उंच  आणि खोल  या दोन्ही स्थानांचा  अनुभव घेतला, असे पंतप्रधान म्हणाले. फक्त दर्शन घेण्यापेक्षा भक्तांनी पवित्र स्थानांचा परिपूर्ण अनुभव घ्यावा यासाठी आशय  निर्मात्यांनी त्यांना प्रेरणा द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.  प्रवासाच्या एकूण बजेटपैकी 5-10  टक्के रक्कम स्थानिक उत्पादनांवर खर्च करावी, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच एक भारत श्रेष्ठ भारत भावनेलाही पाठबळ मिळते, असे ते म्हणाले. देशातील श्रद्धास्थानांना नवसंजीवनी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे  कामिया यांनी आभार मानले.

टेक्निकल गुरुजीगौरव चौधरी या आघाडीच्या यूट्यूबरने टेक क्रिएटर अवॉर्ड जिंकले आहे. डिजिटल इंडियाला आपल्या चॅनेलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे श्रेय जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे आवश्यक आहे.  युपीआय हे याचे मोठे प्रतीक आहे कारण ही सेवा प्रत्येकाची आहे. जेव्हा असे लोकशाहीकरण होईल तेव्हाच जगाची प्रगती होईल.गौरवने पॅरिसमध्ये युपीआयचा वापर केल्याचा अनुभव सांगितला आणि  भारतीय उपाय जगाला मदत करू शकतात, अशी टिप्पणी केली.

 2017 पासून स्वच्छता मोहिमा राबवणाऱ्या मल्हार कळंबे यांना स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी प्लास्टिक प्रदूषण आणि हवामान बदलाबाबतही जनजागृती केली आहे. ते बीच प्लीजचे संस्थापक आहेत. अनेक निर्माते अन्न आणि पौष्टिकतेबद्दल बोलतात, असे ते मल्हार यांना म्हणाले.  मल्हार यांनी आपली वाटचाल आणि मोहिमांविषयी सविस्तर माहिती दिली. कचऱ्याची विल्हेवाट लावताना आपल्या दृष्टिकोनात बदल होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि स्वच्छतेसाठी त्यांनी केलेल्या वातावरणनिर्मितीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार जान्हवी सिंगला मिळाला. जान्हवी ही इंस्टाग्रामवर आशय  तयार करणारी 20 वर्षीय कंटेंट क्रिएटर आहे. ती भारतीय फॅशनबद्दल बोलते आणि भारतीय साड्यांचा प्रचार करते. वस्त्रोद्योग फॅशनसोबत चालतो असे पंतप्रधान म्हणाले आणि भारतीय वस्त्रोद्योगाला  प्रोत्साहन देण्यासाठी जान्हवीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भारतीय संकल्पना पुढे नेणाऱ्या संस्कृती, शास्त्र आणि साडी या आपल्या बोधवाक्याचा तिने पुनरुच्चार केला. तयार पगडी, धोतर आणि नेसणे  आवश्यक असलेल्या अशा पोशाखांकडे असलेल्या ट्रेंडकडे लक्ष वेधत अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याबद्दल जान्हवीचे विचार काय आहेत अशी विचारणा पंतप्रधानांनी केली. तिने भारतीय कापडाच्या सौंदर्याचे वर्णन केले. फॅशनमध्ये भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सर्वोत्कृष्ट क्रिएटिव्ह क्रिएटर- महिला पुरस्कार श्रद्धाला मिळाला तो तिच्या बहुभाषिक कॉमेडी सेटसाठी तसेच पिढ्यानपिढ्या आकर्षक आणि संबंधित सामग्री तयार करण्यासाठी. अय्योहा तिचा ट्रेडमार्क आहे. आपण श्रद्धाला दुसऱ्यांदा भेटत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी तिचे स्वागत केले. जे घरातून विधायक काही तयार करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेणारा हा पुरस्कार आहे असे ती म्हणाली. गंभीर संकल्पना हलक्याफुलक्या विनोदातून मांडण्याचा आपला दृष्टिकोन असल्याचे तिने सांगितले. पुरस्कारविजेत्यांशी पंतप्रधान साधत असलेल्या उत्स्फूर्त संवादाबद्दल श्रद्धाने त्यांचे आभार मानले.

आरजे रौनक याला पुरुष गटात सर्वोत्कृष्ट क्रिएटिव्ह क्रिएटर पुरस्कार मिळाला. रौनक म्हणाला की, ‘मन की बातमुळे  पंतप्रधान देखील रेडिओ क्षेत्रातील  एक महत्त्वाचे, विक्रम प्रस्थापित करणारे म्हणून ओळखले जातात.  रेडिओ क्षेत्राच्या वतीने त्याने पंतप्रधानांचे आभार मानले. यावेळी रौनकने  त्याच्या खास  बौआशैलीची झलक दाखवली.

खाद्य श्रेणीतील सर्वोत्कृष्ट रचनाकाराचा  पुरस्कार कविताज किचनला देण्यात आला , कविता या  एक गृहिणी असून आपल्या पाककृती आणि ट्यूटोरियलसह डिजिटल उद्योजक बनल्या आहेत.  मल्हारच्या सडपातळ शरीरयष्टीबद्दल चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी मिश्कीलपणे कविता यांना त्याची काळजी घेण्यास सांगितले. जीवनातील मुख्य  कौशल्य म्हणून स्वयंपाक शिकण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. शाळांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयी जागरुक केले पाहिजे, जेणेकरून त्यांना अन्नाचे  आणि नासाडीचे महत्त्व कळेल असे त्या म्हणाल्या. लोकांनी विविध ठिकाणांच्या भेटीदरम्यान  स्थानिक खाद्यपदार्थ चाखून  पहावे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी खाद्यपदार्थ संबंधित आशय निर्मात्यांना भरडधान्य – श्रीअन्नाला प्रोत्साहन देण्याचे आणि पौष्टिक मूल्यांबद्दल जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले.  पंतप्रधानांनी त्यांच्या तैवान भेटीची आठवण सांगितली, जिथे त्यांना शाकाहारी भोजनासाठी बौद्ध रेस्टॉरंटला भेट देण्याची शिफारस करण्यात आली होती.  जेव्हा त्यांनी तेथे मांसाहारी पदार्थांसारखे दिसणारे पदार्थ पाहिले आणि त्याबाबत विचारले असता त्यांना सांगण्यात आले की हे शाकाहारी पदार्थ आहेत मात्र त्यांचा आकार चिकन मटण आणि तत्सम पदार्थांसारखा आहेजेणेकरून स्थानिक लोक अशा खाद्यपदार्थांकडे आकर्षित होतील.

नमन देशमुख यांना शैक्षणिक श्रेणीत सर्वोत्कृष्ट आशय निर्माताचा  पुरस्कार मिळाला. नमन हे टेक आणि गॅझेट क्षेत्रातील  इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि आशय निर्माता आहेत . ते तंत्रज्ञान, गॅझेट्स, वित्तपुरवठा , सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल लिहितात  आणि एआय आणि कोडिंग सारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर प्रेक्षकांना मार्गदर्शन करतात.  त्यांनी  विविध ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्याच्या त्यांच्या आशय सामग्रीबद्दल तसेच सरकारी योजनांचे फायदे आणि लाभ मिळवण्याच्या पद्धतींबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. सुरक्षित सर्फिंग आणि सोशल मीडिया पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी आशय निर्मात्यांना  अटल टिंकरिंग लॅबबाबत आशय निर्मिती  करण्यास सांगितले. चांद्रयानसारख्या यशामुळे मुलांमध्ये नव्याने  वैज्ञानिक रुची  निर्माण झाली असून  मुलांना विज्ञान शाखेतील शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, असे  ते म्हणाले.

अंकित बैयनपुरिया याला पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस रचनाकार  पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंकित एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे आणि 75 कठीण आव्हाने पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने पंतप्रधानांबरोबर विविध अभियानासाठी काम केले आहे.  अंकितने उपस्थितांना  नियमितपणे व्यायाम करण्यास आणि संतुलित जीवनशैली जगण्यास सांगितले.

ट्रिगर्ड इन्साननिश्चयला गेमिंग क्रिएटर पुरस्कार  देण्यात आला. तो दिल्लीत राहणारा युट्युबर , लाइव्ह-स्ट्रीमर आणि गेमर आहे. गेमिंग श्रेणीला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

अरिदमनला सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर हा पुरस्कार देण्यात आला. तो वैदिक खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय ज्ञानात पारंगत आहे. त्याने ज्योतिष, अध्यात्म आणि व्यक्तिमत्व विकासाचे ज्ञान मिळवले आहे.  यावेळी पंतप्रधानांनी आपण हात बघून भविष्य सांगतो अशी बतावणी करत  अनारक्षित रेल्वेगाडीच्या  डब्यात दर वेळी  कशी जागा मिळवली याबाबत विनोदी किस्सा सांगितला.  अरिदमन म्हणाला की तो धर्मशास्त्रावर आशय निर्मिती करतो . पुरस्कार म्हणून मिळालेल्या ट्रॉफीमध्ये धर्मचक्र, वृषभ आणि सिंहासह शास्त्रांचे अनेक घटक आहेत असे त्याने सांगितले. धर्मचक्राच्या आदर्शांचे पालन करणे गरजेचे आहे. असे सांगत  अरिदमन याने  भारतीय पोशाख परिधान करण्याच्या गरजेवर भर दिला.

सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर पुरस्कार चमोली,उत्तराखंड येथील पियुष पुरोहित याला देण्यात आला, तो  कमी ज्ञात ठिकाणे, लोक आणि प्रादेशिक उत्सव याबाबत माहिती देतो.  पंतप्रधानांनी मन की बात मध्ये आलेल्या एका विनंतीची आठवण सांगितली , त्यामध्ये केरळमधील मुलींनी चमोलीचे एक गाणे गायले होते.

अमन गुप्ता, boAT चे संस्थापक आणि सीईओ असून शार्क टँक इंडिया मधील त्यांच्या सहभागासाठी प्रसिद्ध आहेत . त्यांना  सर्वोत्कृष्ट सेलिब्रिटी क्रिएटर पुरस्कार देण्यात आला. त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की 2016 मध्ये जेव्हा स्टार्ट अप आणि स्टँड-अप इंडिया सुरु करण्यात आले तेव्हा त्यांनी आपली कंपनी सुरू केली होती . आणि अल्पावधीतच ते जगातील सर्वात मोठ्या ऑडिओ ब्रँडपैकी एक बनले आहेत.

***

N.Chitale/V.Ghode/P.Jambhekar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai