Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले

पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

पंतप्रधान म्हणाले, “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. वसाहतवादापासून भारताला मुक्त करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

नेताजी बोस हे अतिशय बुध्दिमान होते, आणि त्यांनी समाजातील वंचित घटकांच्‍या हिताचा आणि कल्याणाचा नेहमी विचार केला.

नेताजी बोस यांच्याशी संबंधित फायली खुल्या करण्याची आणि अनेक दशके प्रलंबित असलेली लोकप्रिय मागणी पूर्ण करण्याची संधी आमच्या सरकारला मिळाली याचे समाधान आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फायली http://www.netajipapers.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.”

B.Gokhale/S.Kane/Anagha