Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रो फेज-2’ ची पायाभरणी केली आणि ‘नागपूर मेट्रो फेज 1’ राष्ट्राला समर्पित केला

पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रो फेज-2’ ची पायाभरणी केली आणि ‘नागपूर मेट्रो फेज 1’ राष्ट्राला समर्पित केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रो फेज 1 राष्ट्राला समर्पित केला आणि आज खापरी मेट्रो स्थानकावर नागपूर मेट्रो फेज2 ची पायाभरणी केली. खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या दोन मेट्रो रेल्वेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे तर दुसरा टप्पा 6700 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.

फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवरून नागपूर मेट्रोचा प्रवास करत  पंतप्रधानांचे खापरी मेट्रो स्टेशनवर आगमन झाले. फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवर मेट्रोमध्ये चढण्यापूर्वी पंतप्रधानांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अवलोकन केले आणि यावेळी प्रदर्शित केलेल्या सपनो से बेहतर या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. पंतप्रधानांनी स्वत: एएफसी गेटवर तिकीट खरेदी केले आणि विद्यार्थी, नागरिक आणि अधिकाऱ्यांसोबत प्रवास केला. या प्रवासात पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवादही साधला.

पंतप्रधान ट्विटमध्ये म्हणतात,

नागपूर मेट्रोच्या फेज 1 च्या उद्घाटनाबद्दल मी नागपूरकरांचे अभिनंदन करू इच्छितो. दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि मेट्रोचा प्रवास देखील केला. ही मेट्रो आरामदायी आणि सोयीस्कर आहे.

पंतप्रधान कार्यालय ट्विटमध्ये म्हणाले की

नागपूर मेट्रो मध्ये प्रवास करताना पंतप्रधानांनी विद्यार्थी, स्टार्टअप क्षेत्रामधील उद्योजक आणि नागरिकांशी संवाद साधला

खापरी मेट्रो स्टेशनवर पंतप्रधानांचे मेट्रो रेल्वेने आगमन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी हे त्यांच्यासमवेत होते.

पार्श्वभूमी

शहरी गतिशीलतेत क्रांती घडवून आणणाऱ्या आणखी एका टप्प्यात पंतप्रधानांनी खापरी मेट्रो स्थानकावरून,’नागपूर मेट्रो फेज I’ राष्ट्राला समर्पित केला आणि खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्च करून विकसित करण्यात आला आहे. यावेळी 6700 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च करून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो फेज-2 ची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

***

M.Chopade/V.Yadav/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai