Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी धर्मस्थळ येथे श्री मंजुनाथ स्वामी मंदिरात पूजा केली, उजिरे येथे सभेला संबोधित केले

पंतप्रधानांनी धर्मस्थळ येथे श्री मंजुनाथ स्वामी मंदिरात पूजा केली, उजिरे येथे सभेला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कर्नाटक दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज मंगळुरु येथे पोहोचले. तिथून ते धर्मस्थळासाठी रवाना झाले जिथे त्यांनी श्री मंजुनाथ स्वामी मंदिरात पूजा केली. उजिरे येथे एका जनसभेत पंतप्रधानांनी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांना रुपे कार्डे वितरित केली. त्यांनी “धरती मातेचे संरक्षण करा आणि पुढल्या पिढीकडे हस्तांतरित करा” कार्यक्रमाच्या शुभारंभानिमित्त एका लोगोचे अनावरण केले.

जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी भगवान मंजुनाथाची पूजा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की सध्याचे शतक हे कौशल्य विकासाचे आहे. भारत हा एक तरुण देश आहे आणि म्हणूनच आपण जनसांख्यिकीय लाभाचा अवश्य फायदा उचलायला हवा असे ते म्हणाले.

आपले संत आणि महात्म्यांनी अशा अनेक संस्था स्थापन केल्या ज्यांनी शतकानुशतके समाजाला मदत केली असे पंतप्रधान म्हणाले.

महिला बचत गटांना रुपे कार्ड वितरित करण्याच्या संधीबाबत पंतप्रधान म्हणाले डिजिटल व्यवहारांबाबत उत्साह पाहून त्यांना आनंद झाला आहे. त्यांनी जनतेला भीम ॲप वापरण्याचे आणि रोकडविरहित व्यवहार करण्याचे आवाहन केले. प्रामाणिकपणा आणि अखंडतेचे हे युग आहे ज्यामध्ये व्यवस्थेला फसविणाऱ्यांसाठी थारा नाही असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की भारत सरकारचा प्रत्येक रुपया आणि प्रत्येक संसाधन भारतीयांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. विकासाची फळे कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावीत याची आम्ही काळजी घेत आहोत असे ते म्हणाले.

सध्याच्या काळात जल संवर्धन हे आपल्यापुढील एक प्रमुख आव्हान आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले. अल्पावधीतील लाभाचा विचार न करता पर्यावरणाबरोबर सामंजस्याने राहण्याला आपण महत्व देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. त्यांनी कर्नाटकच्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासारखी पध्दत अवलंबण्याचे आवाहन केले, जेणेकरुन जलसंवर्धनात मदत होईल.

B.Gokhale/S.Kane/Anagha