Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसादजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. डॉ प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया रचण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 

“देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरयुक्त श्रद्धांजली . घटनासमितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी करण्यात अमूल्य योगदान दिले. आज संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत असताना त्यांचे जीवन व आदर्श अधिकच प्रेरणादायी ठरते  आहे.” 

***

JPS/UR/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai