Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असूनत्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमुळे ते विशेषतः लक्षात राहतीलअसे म्हटले.

त्यांनी एक्सवरील एका संदेशामध्ये लिहिले,

प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने मन अतिशय दुःखी झाले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होतेज्यांची देशभक्ती त्यांच्या चित्रपटांमधूनही प्रकट होत असे. मनोज जींच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागवली आणि त्या पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरतील. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आणि सर्व चाहत्यांबरोबर आहेत. ॐ शांती.”

***

SonaT/Raj/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai