Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी थायलंडच्या माजी पंतप्रधानांची घेतली भेट

पंतप्रधानांनी थायलंडच्या माजी पंतप्रधानांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची भेट घेतली. त्यांनी संरक्षण, व्यापार, संस्कृती आणि इतर क्षेत्रांमध्ये भारत व थायलंड यांच्यातील सहकार्याच्या अपरिमित शक्यतांवर चर्चा केली.

एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले:

“थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची भेट घेऊन आनंद झाला. त्यांना प्रशासन आणि धोरणनिर्मितीविषयी व्यापक अनुभव आहे. ते भारताचे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे अटलजींसोबत ही अतिशय मधुर संबंध होते.

शिनावात्रा आणि मी भारत-थायलंड सहकार्याबाबत आणि त्याचा आपल्या संबंधित देशांतील नागरिकांना कसा फायदा होतो, यावर सखोल चर्चा केली. तसेच, संरक्षण, व्यापार, संस्कृती आणि इतर क्षेत्रांतील अपार संधींबाबत विचारमंथन केले.”

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai