Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी त्यांच्या आगामी कर्नाटक दौऱ्याचे ठळक मुद्दे केले सामायिक


नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत

या संदर्भात त्यांनी ट्विट केले की:

“मी उद्या, 12 मार्च रोजी मांड्या आणि हुबळी-धारवाडमधील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकात असेन. उद्या 16,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन किंवा पायाभरणी केली जाईल.

https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1905535

“मांड्या येथे उद्या, 12 मार्च रोजी, बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित केला जाईल. म्हैसूर-कुशालनगर महामार्गाची पायाभरणी देखील यावेळी केली जाईल. या प्रकल्पांमुळे कनेक्टीव्हिटी वाढणार असून  सामाजिक-आर्थिक विकासालाही  चालना मिळेल.

“हुबळी-धारवाडमधील विकासकामांमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड आणि श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वात लांब रेल्वे फलाट यासारखे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील. पाणीपुरवठा योजनेची सुद्धा पायाभरणी केली जाईल.”

कर्नाटकमधील विकास प्रकल्पांबाबत खासदार प्रताप सिम्हा यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, ‘आमचे सरकार कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी काम करत आहे.  म्हैसूर आणि बेंगळुरू दरम्यानचा द्रुतगती मार्ग  त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.’

पुनर्विकसित होसपेट रेल्वे स्थानकाबाबत  डीडी न्यूजच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:

“होसपेटच्या लोकांचे अभिनंदन.  सांस्कृतिक संबंधाबरोबरच कनेक्टिव्हिटी आणि व्यापारालाही  चालना मिळेल.”

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी धारवाडशी संबंधित प्रकल्पांबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

“उद्या जी नवीन कामे सुरू केली जातील त्यामुळे हुबळी-धारवाडच्या लोकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढेल.”

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai