Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जिनेवा येथे स्विसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली – आर्थिक बाबींवर प्रकाशझोत

पंतप्रधानांनी जिनेवा येथे स्विसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली – आर्थिक बाबींवर प्रकाशझोत

पंतप्रधानांनी जिनेवा येथे स्विसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली – आर्थिक बाबींवर प्रकाशझोत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज जिनेवा येथे स्विसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यापारिक गोलमेज परिषदेस भेट घेतली. या बैठकीमध्ये विविध क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत एबीबी, लाफार्ज नोवार्टिस, नेस्ले, राइटर, रॉश सह अनेक स्विस मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते.

व्यापार प्रमुखांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास जलदगतीने होत आहे. आणि एकत्रित कार्य करणे विकासासाठी आवश्यक आहे, यामुळे स्विस व्यावसायिक क्षमता देखील लाभान्वित होईल. ते म्हणाले की, दोन्ही देशांचे आर्थिक संबंध मजबूत होत आहेत याचा मला आनंद आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत आहेत. भारत ही केवळ 1.25 अब्जची बाजारपेठ नाही तर आमच्याकडे कौशल्य आणि व्यापारासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करणारे एक सरकार देखील आहे. ते पुढे म्हणाले की, भारत जागतिक मानकांनुसार निर्मिती करु इच्छितो आणि त्यामुळे कौशल्य विकासाचा स्विस आराखडा यासाठी अनुरुप आहे.

दिवसाच्या पूर्वार्धात पंतप्रधानांनी स्वितझरलँडचे राष्ट्रपती श्नाईडर अम्मान्न यांच्यासोबत भारत व स्वित्‍झरलँडमधील बहुआयामी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. या चर्चेदरम्यान, व्यापार तंत्रज्ञान, कौशल्य विकास, नवीकरणीय ऊर्जेमधील सहकार्यावर विचारविनिमय करण्यात आला. समान कटिबध्दता, मूल्य, व्यक्ती ते व्यक्ती व आर्थिक संबंध यामुळे भारत-स्वित्झरलँडचे संबंध नवीन उंचीवर पोहोचतील असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
जिनेवा मध्ये सीईआरएन येथे भारतीय वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांच्या एका गटाने पंतप्रधानांची भेट घेतली.

S.Mhatre/B.Gokhale