Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चिलीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फाॅन्ट यांचे दिल्लीत केले स्वागत


नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत चिलीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांचे हार्दिक स्वागत केले, जे भारत-चिली भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लॅटिन अमेरिकेतील एक प्रमुख मित्र म्हणून चिलीचे महत्त्व अधोरेखित करून, राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली. त्यांनी खनिजे, ऊर्जा, संरक्षण, अवकाश आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सहकार्यासाठी प्रचंड क्षमता असलेली क्षेत्रे म्हणून ओळखले आणि त्यावर चर्चा केली.

चिलीमध्ये योग आणि आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता हा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरावा म्हणून काम करत असून आरोग्यसेवा क्षेत्र निकटच्या संबंधांसाठी एक आशादायक मार्ग म्हणून उदयाला येत आहे.

विद्यार्थी विनिमय कार्यक्रम आणि इतर उपक्रमांद्वारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्वही दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात त्यांनी लिहिले आहे :

“भारत एका खास मित्राचे स्वागत करतो!

दिल्लीमध्ये राष्ट्रपती गॅब्रिएल बोरिक फोंटचे स्वागत करणे आनंददायक आहे. लॅटिन अमेरिकेत चिली हा आमचा एक महत्त्वाचा मित्र आहे. आजची आमची चर्चा भारत-चिली द्विपक्षीय मैत्रीला महत्त्वपूर्ण चालना देईल.

@GabrielBoric”

“चिलीबरोबर आर्थिक संबंध वाढविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी चर्चा सुरू व्हावी याबाबत राष्ट्रपती गॅब्रिएल बोरिक फोंट आणि माझ्यात सहमती झाली. महत्त्वपूर्ण खनिजे, ऊर्जा, संरक्षण, अवकाश आणि कृषी यासारख्या निकट संबंध स्थापित करता येतील अशा क्षेत्रांवर देखील आम्ही चर्चा केली.”

“भारत आणि चिलीला आणखी जवळ आणण्याची मोठी क्षमता विशेष करून आरोग्य सेवांमध्ये आहे. चिलीमध्ये योग आणि आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता आनंददायी आहे. सांस्कृतिक आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांद्वारे आपल्या राष्ट्रांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

 

* * *

S.Kane/Nandini/Shraddha/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai