Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चंदिगड कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस- पंतप्रधानांचा सामूहिक योग संचलनात सहभाग; जनतेशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदिगडमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. सुमारे 30 हजार लोकांबरोबर ते सामूहिक योग संचलनात सहभागी झाले.

कॅपिटॉल कॉम्प्लेक्समध्ये जमलेल्या जनतेला पंतप्रधानांनी संबोधित केले. देशातल्या सर्व भागातले लोक योगाने जोडले गेले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पनेला पाठिंबा द्यायला जग पुढे आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या प्रयत्नात समाजातल्या सर्व स्तरातले लोक एकत्र आले, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिवस चांगल्या आरोग्याशी जोडला असून ती एक लोकचळवळ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपल्याला काय मिळेल, याबाबत योग नसून आपण कशाचा त्याग करु शकू, याबाबत योग आहे.

पैसा खर्च न करता योग आरोग्याची हमी देतो आणि गरीब-श्रीमंत असा भेद योग करत नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.

योगाच्या माध्यमातून मधुमेहावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यावर पंतप्रधानांनी पुढल्या वर्षभरात लक्ष्य केंद्रित करायला सांगितले आहे. योगाचा प्रचार करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावर एक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.

सामूहिक योग संचलनात सहभाग घेतलेल्यांबरोबर पंतप्रधान यावेळी मिसळले. त्यांनी त्यांची विचारपूस केली.

S.Kulkarni/B. Gokhale