Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट

पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यटन, संस्कृती तसेच जनतेतील परस्पर संबंध यांसह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञाने, नवीकरणीय उर्जा, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेष तसेच व्यावसायिक आणि कुशल कारागिरांची गतिशीलता यांसारख्या नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्याची वाढती क्षमता या नेत्यांनी अधोरेखित केली. या दोन्ही नेत्यांनी बैठकीदरम्यान क्षेत्रीय घडामोडी तसेच भारत-युरोपीय महासंघ नातेसंबंधांसह परस्पर स्वारस्याच्या जागतिक विषयांवर आपापली मते मांडली. क्षेत्रीय तसेच बहुपक्षीय मंचांवरील विद्यमान घनिष्ठ सहकार्य यापुढेही सुरु ठेवण्यास त्यांनी संमती दर्शवली.

वर्ष 2025 मध्ये भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत हे लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी सुयोग्य पद्धतीने संयुक्तपणे हा सोहोळा साजरा करण्यावर एकमत व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी यापुढे एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai