Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साऊथ ब्लॉक येथे पंतप्रधान कार्यालयाते सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पंतप्रधानांचे प्रधान सचिव भुपेंद्र मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, अतिरिक्त प्रधान सचिव पी.के.मिश्रा, सचिव भास्कर खुलबे यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येकाने स्वत:ला समर्पित करायला हवे आणि नव्या जोमाने काम करायला हवे असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेच्या या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांमधूनच पंतप्रधान कार्यालयाला काम करण्याची ऊर्जा मिळते असे ते म्हणाले. पंतप्रधान कार्यालय चमूतल्या प्रत्येक सदस्याचे गेल्या पाच वर्षातले योगदान लक्षात घेत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान कार्यालयातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar