Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने इराणचे राष्ट्रपती महामहीम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांची भेट घेतली.

व्यापार आणि गुंतवणूक, संपर्क व्यवस्था, ऊर्जा आणि दहशतवादविरोधी लढा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. चाबहार प्रकल्पासह पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सहकार्य वाढविण्यास उभय बाजूंनी सहमती दर्शवली.  अफगाणिस्तानसह प्रादेशिक विकासाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला.

ब्रिक्स परिवारात सामील झाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती रईसी यांचे अभिनंदन केले.

चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. तसेच इराणच्या ब्रिक्स सदस्यत्वासाठी भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

***

Sonal T/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai