Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधानांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा


नवी दिल्‍ली, 7 जुलै 2023 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस  गाड्यांना आज हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. 498 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित स्थानकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन शुक्ला, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

गोरखपूर – लखनौ वंदे भारत एक्स्प्रेस अयोध्या मार्गे  जाईल आणि ही गाडी सुरू केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे आणि उत्तर प्रदेशातील  महत्त्वाच्या शहरांशी अधिक चांगला संपर्क प्रस्थापित  केला जाणार आहे. 

जोधपूर – साबरमती वंदे भारत एक्सप्रेस, या क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देत  जोधपूर, अबू रोड आणि अहमदाबाद सारख्या प्रसिद्ध ठिकाणांशी दळणवळण सुधारणार आहे.

498 कोटी रुपये खर्चून गोरखपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून तिथे प्रवाशांना  जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai