Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला दिली भेट

पंतप्रधानांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला दिली भेट

पंतप्रधानांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला दिली भेट


नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट दिली. त्यांनी रोबोटिक्स गॅलरी, नेचर पार्क, एक्वाटिक गॅलरी आणि शार्क टनेलला भेट दिली, आणि यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली.  

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर (X) संदेशात म्हटले आहे:

“सकाळचा काही वेळ गुजरात सायन्स सिटी येथील चित्ताकर्षक प्रदर्शन स्थळाला भेट देण्यामध्ये व्यतीत केला. रोबोटिक्स गॅलरीपासून सुरुवात केली, या ठिकाणी रोबोटिक्सची अफाट क्षमता अतिशय खुबीने प्रदर्शित केली आहे. तरुणांमध्ये कुतूहल जागे करणारे हे तंत्रज्ञान पाहताना आनंद वाटला.”

रोबोटिक्स गॅलरी मध्ये DRDO रोबोट्स, मायक्रोबॉट्स, कृषी रोबोट, वैद्यकीय रोबोट्स, स्पेस रोबोट आणि बरेच काही प्रदर्शित करण्यात आले आहे. या आकर्षक प्रदर्शनांमधून आरोग्य सेवा, उत्पादन आणि दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची रोबोटिक्सची क्षमता स्पष्ट दिसून येते.”

“रोबोटिक्स गॅलरीमधील कॅफेमध्ये रोबोट्सने दिलेल्या चहाचाही आस्वाद घेतला.”

“नेचर पार्क ही गजबजलेल्या गुजरात सायन्स सिटीमधील एक शांत आणि चित्ताकर्षक जागा आहे. निसर्गप्रेमी आणि वनस्पतिशास्त्रज्ञांनी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी. हे उद्यान केवळ जैवविविधतेला प्रोत्साहन देत नाही, तर लोकांसाठी एक शैक्षणिक व्यासपीठ म्हणूनही काम करते.”

“या ठिकाणच्या पायवाटा बहुविध अनुभव देतात. त्या पर्यावरण  संरक्षण आणि शाश्वतता यावर मोलाची माहिती देतात. इथले कॅक्टस गार्डन, ब्लॉक प्लांटेशन, ऑक्सिजन पार्क आणि अशा अनेक जागांनाही जरूर भेट द्या.”

“सायन्स सिटी येथील एक्वाटिक गॅलरी, पाण्यामधील जैवविविधता आणि सागरी आश्चर्यांची  प्रचीती देते. आपल्या जल परिसंस्थेच्या नाजूक आणि तरीही गतिशील संतुलनावर ती प्रकाश टाकते. हा केवळ एक शैक्षणिक अनुभव नसून, पाण्याखाली दडलेल्या जगाचे संवर्धन  आणि आदर करण्यासाठी केलेले आवाहन आहे.”

“शार्क टनेल हा विभाग शार्क माशाच्या प्रजातींच्या विविध श्रेणीचे प्रदर्शन करत असून, एक  आनंददायक अनुभव देतो. या टनेल (बोगदा) मधून चालताना, आपल्याला सागरी जीव सृष्टीच्या विविधतेचे आश्चर्य वाटेल. ते खरोखर मोहक आहे.”

“अत्यंत सुंदर आहे.”

पंतप्रधानांबरोबर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते.    

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai