Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कोलकाता येथे बेलूर मठाला दिली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच  राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोलकात्यातील बेलूर मठाला भेट दिली. मठातील भिक्षूंसोबत त्यांनी संवादही साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशवासीयांसाठी, बेलूर मठाच्या या पवित्र भूमीत येणे म्हणजे तीर्थयात्रेला येण्यासारखे आहे, परंतु आपल्यासाठी मात्र  नेहमीच घरी परत आल्यासारखे असते. या पवित्र ठिकाणी रात्री वास्तव्य करण्याची संधी  मिळाल्याबद्दल ते म्हणाले की, स्वामी राम कृष्ण परमहंस, माता शारदा देवी, स्वामी ब्रह्मानंद आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह सर्व गुरुंची ओळख येथे जाणवते.

त्यांनी त्यांच्या मागील भेटीत स्वामी आत्मास्थानानंदजींचा आशीर्वाद घेतल्याची आठवण सांगितली. पंतप्रधान म्हणाले की स्वामींनी त्यांना लोकसेवेचा मार्ग दाखविला.

“आज ते भौतिकदृष्ट्या हजर नाहीत मात्र त्यांचा मार्ग नेहमीच आपल्यासाठी मार्ग सुकर करेल.”

ते म्हणाले की, तेथे असलेल्या तरुण ब्रह्मचार्यांबरोबर काही क्षण घालवण्याची संधी त्यांना मिळाली आणि एकदा त्यांच्याही मनाची अवस्था ब्रह्मचार्यांसारखी झाली होती. विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व, विवेकानंदांचे विचार, यामुळे भारावून आपल्यातील बहुतेक लोक येथे दाखल झाले आहेत. पण या भूमीवर आल्यानंतर माता अण्णा शारदादेवीच्या पदराने आम्हाला स्थायिक होण्यासाठी आईचे प्रेम देते.

“जाणीवपूर्वक किंवा नकळत, देशातील प्रत्येक तरुण हा विवेकानंदांच्या संकल्पचा एक भाग आहे. काळ बदलला, दशके बदलली, शतक बदलले,परंतु स्वामीजींचा तरुणांना प्रेरणा आणि  जागृत करण्याचा संकल्प कायम आहे. त्यांचा हा प्रयत्न भावी  पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”

देशातील तरुणांना, ज्यांना असे वाटते की ते एकटे हे जग बदलू शकत नाहीत, त्यांना पंतप्रधानांनी “आपण कधीच एकटे नसतो  असा साधा मंत्र दिला.

21 व्या शतकासाठी, देशाने मोठ्या निर्धाराने नवीन भारत घडविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत आणि हे संकल्प केवळ सरकारचे नाहीत, तर देशातील तरुणांचे, 130 कोटी देशवासीयांची आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या पाच वर्षातील अनुभवावरून असे दिसून येते की देशातील तरुणांशी संपर्क साधण्याची मोहीम नक्की यशस्वी होईल. ते म्हणाले की पाच वर्षांपूर्वी भारत स्वच्छ असू शकतो की नाही याबद्दल तसेच भारतात डिजिटल व्यवहारांचा प्रसार इतका वाढवता येतो का? याबाबत साशंकता होती. मात्र  देशातील तरूणांनी पुढाकार घेतल्यामुळे हा  बदल दिसून आला असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, 21 व्या शतकाच्या या दशकात भारताला परिवर्तनासाठी तरुणांमधील उत्कटता आणि उर्जा हाच पाया आहे. युवक समस्येचा सामना करतात, त्याचे निराकरण करतात आणि आव्हानांनाच आव्हान देतात. या विचारसरणीच्या अनुषंगाने केंद्र सरकार देखील  देशासमोरची  अनेक दशके जुनी आव्हाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक युवकाची समजूत घालणे,  नागरिकता दुरुस्ती कायद्याबद्दल त्यांचे समाधान करणे आणि त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे ही आपली जबाबदारी आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा नागरिकत्व हिरावून घेण्याचा कायदा नाही, तर नागरिकत्व देणारा हा कायदा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विभाजनानंतरच्या पाकिस्तानवरील  धार्मिक श्रद्धेमुळे ज्यांचा छळ झाला, अत्याचार झाले, त्यांना भारताचे नागरिकत्व सुलभरित्या मिळावे यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा ही केवळ एक सुधारणा आहे. त्यावेळी महात्मा गांधींसह अनेक नेत्यांनीही याला दुजोरा दिला. याशिवाय आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती, त्याचा देवावर विश्वास असो किंवा नसो, … जो कोणी भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवतो, तो विहित प्रक्रियेनुसार भारताचे नागरिकत्व घेऊ शकतो. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने देखील कायद्याने उत्तर-पूर्वेच्या लोकसंख्येवर होणाऱ्या विपरीत परिणामांसाठी तरतूद केली आहे. या  स्पष्टीकरणानंतरही, काही लोक त्यांच्या राजकीय कारणास्तव नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल सतत संभ्रम पसरवित आहेत.

ते म्हणाले की, नागरिकत्व कायद्यातील या दुरुस्तीमुळे वाद निर्माण झाला नसता तर जगालाही पाकिस्तान अल्पसंख्यक लोकांवर काय अत्याचार करतो हे समजले नसते. मानवाधिकारांचे कसे उल्लंघन केले गेले आहे. आमच्या या पुढाकाराचा हा  परिणाम आहे की आता पाकिस्तानला उत्तर द्यावे लागेल की 70 वर्षात आपण तेथील अल्पसंख्याकांवर का अत्याचार केले.

पंतप्रधान म्हणाले की, आपली संस्कृती आणि आपल्या राज्यघटनेची अशी अपेक्षा आहे की आपण नागरिक म्हणून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणाने आणि पूर्ण समर्पणाने पार पाडली पाहिजे. प्रत्येक भारतीयांचे कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे असले पाहिजे. आणि या मार्गाचा अवलंब केल्यास जागतिक मंचावर भारताला  त्याच्या नैसर्गिक स्थानावर पाहू शकू. प्रत्येक भारतीयांकडून स्वामी विवेकानंदांची हीच अपेक्षा होती आणि हीसुद्धा या संस्थेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यांची स्वप्ने साकार करण्याचा संकल्प आपण सर्व करत आहोत असे ते शेवटी म्हणाले.

 ***

D.Wankhede/S.Kane/P.Malandkar