कुवेत भेटीच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील मीना अब्दुल्ला भागातल्या लेबर कॅम्पला भेट दिली, जिथे जवळजवळ 1500 भारतीय नागरिक काम करतात. पंतप्रधानांनी भारतातील विविध राज्यांतून तिथे आलेल्या मजुरांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली.
मजुरांच्या छावणीला भेट देणे हे परदेशातील भारतीय कामगारांच्या कल्याणाला पंतप्रधानांनी दिलेल्या महत्त्वाचे प्रतीक आहे. मागील काही वर्षांत, सरकारने परदेशातील भारतीय कामगारांच्या कल्याणासाठी अनेक तंत्रज्ञान-आधारित उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात ई-मायग्रेट पोर्टल, मदद पोर्टल आणि सुधारित प्रवासी भारतीय विमा योजना यांचा समावेश होतो.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com