Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कार निकोबारमध्ये आयटीआय आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी कार निकोबारमध्ये आयटीआय आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी कार निकोबारमध्ये आयटीआय आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी कार निकोबारमध्ये आयटीआय आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे केले उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार निकोबारला भेट दिली.

त्सुनामी स्मारकावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि वॉल ऑफ लॉस्ट सोल्स वर मेणबत्ती प्रज्वलित केली.

बेटावरच्या आदिवासी प्रमुखांशी आणि प्रसिद्ध क्रीडापटुंशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

अरोंग इथे त्यांनी आयटीआयचे आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन केले. तसेच जनतेला संबोधितही केले.

मुस जेट्टीजवळच्या किनारा संरक्षण कामाची त्यांनी पायाभरणी केली. तसेच कॅम्पबेल बे जेट्टीच्या विस्तारीकरणाचे भूमीपूजनही केले.

यावेळी बोलताना त्यांनी या बेटाचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, कला आणि परंपरा विषद केली. बेटावरच्या कौंटुंबिक आणि एकत्रित परंपरेविषयी बोलताना भारतीय समाजाची वर्षानुवर्ष ही ताकद राहिल्याचे सांगितले. या कार्यक्रमाआधी वॉल ऑफ लॉस्ट सोल्स, त्सुनामी स्मारकाला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. त्सुनामीनंतर बेटाची पुन्हा उभारणी करण्यासाठी निकोबार बेटावरच्या जनतेने केलेल्या कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या धैर्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

आज उद्‌घाटन झालेल्या कामांमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, वाहतूक, ऊर्जा, क्रीडा आणि पर्यटन या क्षेत्राच्या विकासाला मदत होणार आहे. विकासाच्या प्रवासात कोणतीही व्यक्ती अथवा देशाचा कोणताही भाग मागे राहता कामा नये, या सरकारच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला.

समुद्रालगत भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कार निकोबार बेटाचे संरक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. आयटीआयमुळे बेटावरच्या युवकांचे कौशल्यासह सबलीकरण व्हायला मदत होणार आहे. निकोबार बेटावरच्या युवकांच्या क्रीडा नैपुण्याविषयी बोलताना, आधुनिक क्रीडा संकुलामुळे या युवकांच्या कौशल्याला आणखी झळाळी मिळेल. भविष्यात क्रीडाविषयक आणखी पायाभूत सुविधांची भर घालण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

अंदमान निकोबार बेटावरच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी आपले सरकार काम करत आहे. बेटावरच्या आरोग्यसेवा सुविधांच्या विस्ताराविषयाला पंतप्रधानांनी स्पर्श केला.

पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करत विकास साधण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे.

कृषी क्षेत्राविषयी बोलताना, खोबऱ्‍याच्या आधारभूत किंमतीत वाढ केल्याचा उल्लेख त्यांनी केला. मत्स्य संबंधित क्षेत्रातल्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी आपले सरकार काम करत आहे. देशातले मत्स्य क्षेत्र अधिक फायदेशीर ठरावे यासाठी 7000 कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. देशात समुद्राजवळ असणारे भाग नीलक्रांतीची केंद्रे ठरु शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

समुद्री वनस्पतीच्या शेतीला प्रोत्साहन दिले जात असून, आधुनिक बोटींच्या खरेदीसाठी मच्छिमारांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. सौर ऊर्जोच्या वापरासाठी भारत प्रयत्न करत आहे. यासंदर्भात त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उल्लेख केला.

साधनसंपत्ती आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टीनी संपूर्ण निकोबार बेट आणि जवळचे मलाक्का सामुद्रधुनी महत्वाची असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे लक्षात घेऊन योग्य वाहतूक पायाभूत संरचना विकसित करण्यात येत आहे. मुस आणि कॅम्पबेल जेट्टीसाठीची विकास कामे त्यांनी विषद केली. बेटाच्या विकासाप्रती सरकारच्या कटीबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

***

B.Gokhale/N. Chitale/D. Rane