Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कतारच्या अमिरांशी संवाद साधला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर महामहीम शेख तमीम बीन हमद अल्‌ थानी यांच्याशी संवाद साधला. कतारच्या अमीरांनी पंतप्रधानांशी संवाद साधून, त्यांना कतार भेटीचे निमंत्रण दिले.

कतारच्या अमीरांनी मार्च 2015 मध्ये दिलेल्या भारत भेटीचे स्मरण यावेळी पंतप्रधानांनी केले. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि गती मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. कतार बरोबरच्या संबंधांना भारत अधिक महत्व देत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. कतारमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांचे हित जपतांनाच त्यांच्या स्थैर्य आणि सुरक्षेबाबत, अमीर तसेच कतार सरकार उचलत असलेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, संरक्षण, संस्कृती आणि लोकांचा परस्परांशी संवाद यासह इतर द्विपक्षीय मुद्दयांबाबत सहकार्य वाढवण्याबाबतही दोन्ही नेत्यांदरम्यान चर्चा झाली. भारताच्या आर्थिक विकासात भागीदार होण्याबाबत कतार उत्सुक असल्याचा पुनरुच्चार कतारच्या अमीरांनी केला.

प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी कतार बजावत असलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

दोन्ही देशांना सोयीस्कर असणाऱ्या तारखांना, कतारला भेट देण्याच्या निमंत्रणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकार केला.

J.Patnakar/S.Tupe