Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली


ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दूरध्वनी केला.

नुकताच केलेला भारत दौरा यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान टर्नबुल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

कुशल व्यावसायिकांच्या व्हिसा कार्यक्रमासंबंधी ऑस्ट्रेलियाने अलिकडेच केलेल्या बदलांच्या संभाव्य परिणामांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. दोन्ही देशांचे अधिकारी या मुद्दयावर परस्परांच्या संपर्कात राहतील यावर दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली.

गेल्या महिन्यात टर्नबुल यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर करण्यात आलेला पाठपुरावा तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांबाबतही दोन्ही पंतप्रधानांनी चर्चा केली.

B.Gokhale/S.Kane/Anagha