Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये मान्यवरांना भेटून त्यांच्याशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये विविध मान्यवरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मान्यवरांमध्ये कार्लोस मोंटेस, प्रो. जोनाथन फ्लेमिंग, डॉ. अँन लिबर्ट, प्रा .  वेसेलिन पोपोव्स्की, डॉ. ब्रायन ग्रीन, अलेक रॉसओलेग आर्टेमिव्ह आणि  माइक मॅसिमिनो यांचा समावेश होता.

एक्स वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

आज एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये  कार्लोस मोंटेस यांच्याशी संवाद साधला. सामाजिक नवोन्मेषाना गती देण्यात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक आणि इतर क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. ”

एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटशी निगडित असलेले प्रा .  जोनाथन फ्लेमिंग यांची भेट झाली. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात त्यांचे जीवन विज्ञानातील कार्य अनुकरणीय आहे. या क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावंताना आणि नवोन्मेषाना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड तितकीच प्रेरणादायी आहे.”

डॉ. अँन लिबर्ट यांना भेटून आनंद झाला. पार्किन्सन आजारावर उपचार करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे आणि आगामी काळात ते अनेक लोकांसाठी जीवनमान उंचावेल. “

प्रा. वेसेलिन पोपोव्स्की यांना भेटून आनंद झाला. झपाट्याने  बदलणाऱ्या जगात आंतरराष्ट्रीय संबंध आणि भौगोलिक -राजकारणाची समज वाढवण्यासाठी त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे.”

भौतिकशास्त्र आणि गणिताची अतिशय आवड असलेले एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. ब्रायन ग्रीन यांना भेटून आनंद झाला. त्यांच्या कामांचे सर्वत्र कौतुक केले जाते आणि आगामी काळात ते शैक्षणिक संवादाला आकार देतील .  @bgreene”

आज  अलेक रॉस यांना भेटून आनंद झाला. त्यांनी एक यशस्वी  विचारवंत आणि लेखक म्हणून एक ठसा उमटवताना नवोन्मेष आणि शिक्षणाशी संबंधित पैलूंवर भर दिला आहे.”

रशियातील एक आघाडीचे अंतराळवीर  ओलेग आर्टेमेव्ह यांना भेटून आनंद झाला. काही सर्वात अग्रगण्य मोहिमांमध्ये ते आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक तरुणांना विज्ञान आणि अंतराळाच्या जगात छाप पाडण्यासाठी प्रेरणा मिळेल. @OlegMKS”

प्रतिष्ठित अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांना भेटून आनंद झाला. अंतराळाप्रति त्यांची आवड आणि तरुणांमध्ये ते लोकप्रिय करणे हे सर्वांनाच माहीत आहे. शिक्षण आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन  देण्यासाठी ते करत असलेले काम देखील कौतुकास्पद आहे. @Astro_Mike”

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com